Pankaja munde: धुसपूस कायम! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची दांडी, राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

पक्षातील अंतर्गत वादावर पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी हा दौरा रद्द केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Devendra Fadnavis/ Pankaja Munde
Devendra Fadnavis/ Pankaja MundeSaam TV

विनोद जिरे, बीड

Beed News: गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांच्याच पक्षातून डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना शिवसेनेमधून ऑफर आली होती, ज्यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र पक्षातील या नाराजीवर पंकजा मुंडे यांनी मात्र, प्रतिक्रिया देणे टाळले होते.

पक्षातील या वादावनंतर बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमानिमित्त पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची बातमी समोर आली होती. पक्षातील या अंतर्गत वादावर पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी हा दौरा रद्द केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. (Beed News)

Devendra Fadnavis/ Pankaja Munde
Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे दोघांचा मृत्यू; १२ जिल्ह्यांना सावधगिरीचा इशारा

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या 47 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत.सकाळी 11: 20 वाजता ते गहनीनाथ गडावर दाखल होणार आहेत.

मात्र यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी पुण्यतिथी उत्सवाला मुंडे बहीण भाऊ येत असतात मात्र यंदा धनंजय मुंडे यांच्यावर उपचार असल्याने ते येणार नाहीत. तर पंकजा मुंडे या देखील येणार नसल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis/ Pankaja Munde
Mumbai Marathon 2023 : रन मुंबई रन… तब्बल दोन वर्षानंतर मुंबई मॅरेथॉन; मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग

दरम्यान एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही दिवसात बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये फडणवीस हे दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात येत आहेत. तर पंकजा मुंडेंची फडणवीसांच्या दौऱ्याला दांडी असल्याचेच पाहायला मिळत आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com