गुरुवारी झालेल्या हंड्रेड प्लेअर ऑक्शनमध्ये सनरायझर्स लीड्सने मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदला खरेदी केले आहे. यानंतर सनरायझर्स फ्रँचायझीच्या सीईओ काव्या मारनला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अबरारला खरेदी करण्याच्या टीमच्या निर्णयाला लज्जास्पद म्हटले आहे. आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादवरही टीका करण्यात येत असून काव्याला जनतेच्या संतापाचा सामना करावा लागत आहे.
चेन्नईतील मीडिया ग्रुप सन ग्रुपच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्सने गुरुवारी इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेसाठी झालेल्या ऑक्शनमध्ये अबरार अहमदवर बोली लावत त्याला विकत घेतले. यामुळे तो या स्पर्धेसाठी भारतीय फ्रँचायझीने करारबद्ध केलेला पहिला पाकिस्तानी खेळाडू बनला आहे. ट्रेंट रॉकेट्ससोबतच्या बोलीनंतर सनरायझर्सने अहमदला खरेदी करण्यासाठी १९०,००० GBP म्हणजे अंदाजे ₹२.३४ कोटी रुपये मोजले.
भारतीय क्रिकेट चाहते सोशल मीडियावर सनरायझर्स फ्रँचायझीवर टीका करत आहेत. या टीकेदरम्यान सनरायझर्स लीड्सचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय. अकाऊंट का सस्पेंड करण्यात आलंय याचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही.
सन ग्रुप हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचाही मालक आहे. गेल्या वर्षी त्यांनी माजी नॉर्दर्न सुपरचार्जर्स टेकओव्हर केले होते. ईसीबीकडून ४९% हिस्सा आणि काउंटी क्लब यॉर्कशायरकडून उर्वरित ५१% हिस्सा असा अंदाजे १०० मिलियनला विकत घेतलं.
सनरायझर्सची सीईओ काव्या मारन ऑक्शनमध्ये सहभागी झाली होती. सन ग्रुपकडे दक्षिण आफ्रिकेच्या SA20 मधील सनरायझर्स ईस्टर्न केपची देखील मालकी आहे, परंतु त्या टीममध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश नाही.
अबरारला खरेदी केल्यानंतर काव्या मारनला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. लिलावात विकला गेलेला अबरार हा दुसरा पाकिस्तानी खेळाडू होता. यापूर्वी आणखी एक मिस्ट्री स्पिनर गोलंदाज उस्मान तारिकला बर्मिंगहॅम फिनिक्सने GBP 140,000 म्हणजे अंदाजे 1.72 कोटींमध्ये विकत घेतले आहे. फिनिक्सचा आयपीएलशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.