Karn Sharma hits 3 sixes in last over of mitchell starc in kkr vs rcb match watch video amd2000 twitter
Sports

KKR vs RCB Last Over: 20 व्या षटकातील थरार! IPL च्या सर्वात महागड्या खेळाडूला फिरकी गोलंदाजाने ठोकले ३ षटकार -Video

KKR vs RCB, Karn Sharma Sixes On Mitchell Starc Bowling: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्धच्या सामन्यात २१ धावांचा बचाव करताना मिचेल स्टार्कला घाम फुटला. शेवटच्या षटकात कर्ण शर्माने फलंदाजी करताना त्याला ३ षटकार मारला.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला चांगलाच भाव मिळाला. त्याचं नाव स्क्रिनवर येताच सर्व संघांमध्ये त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली.

अखेर कोलकाता नाईट रायडर्सने २४.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरली. मात्र त्याला नावाला आणि आयपीएलमध्ये लावण्यात आलेल्या बोलीला साजेशी कमगिरी करता आलेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्धच्या सामन्यात २१ धावांचा बचाव करताना त्याला घाम फुटला.

शेवटच्या षटकात काय घडलं?

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवण्यासाठी २१ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करण्यासाठी कोलकाताकडून मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे ८ फलंदाज माघारी परतले. त्यामुळे असं वाटलं होतं की, हा सामना पण गेला. मात्र फलंदाजी करत असलेल्या कर्ण शर्माने पहिल्याच चेंडूवर पॉईंटच्या वरुन खणखणीत षटकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव राहिला. तिसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा एकदा मोठा फटका खेळत षटकार खेचला. त्यानंतर तिसरा चेंडूही त्याने सीमारेषेपार पोहचवला.

रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या २ चेंडूत ३ धावांची गरज होती. त्यावेळी कर्ण शर्माने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सरळ मिचेल स्टार्कच्या हातात गेला. शेवटच्या चेंडूवर कोलकाताला जिंकण्यासाठी ३ धावांची गरज होती. त्यावेळी लॉकी फर्ग्युसनने फटका खेळला. त्याने एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेत असताना तो धावबाद झाला. शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT