kane williamson News, Cricket News Updates in Marathi saam tv
Sports

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापुर्वी न्यूझीलंडला बसला मोठा धक्का

न्यूझीलंड संघाचा आज इंग्लंडबराेबर दूसरा कसाेटी सामना खेळविला जाणार आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या (New Zealand Cricket Team) इंग्लंड दौऱ्यातील अडचणी वाढतच चालल्या आहेत. अनुभवी अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर होता. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने पाच गडी बाद करुनही न्यूझीलंडने सामना गमावला. लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटी सामन्यातील (cricket) पराभवानंतर आता कर्णधार केन विल्यमसन याला देखील दुसऱ्या कसोटी सामन्यात बाहेर रहावे लागत आहे. विल्यमसन (Kane Williamson) याचा कोविड-19 चा (covid) अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यास आजचा सामना खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Kane Williamson tested covid-19 positive)

गुरुवारी कोरोनाची किरकोळ लक्षणे दिसल्यानंतर विल्यमसनची रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) करण्यात आली. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्याला पाच दिवस अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ते यापुर्वीच इंग्लंडकडून ०-१ असे पिछाडीवर आहेत. (Cricket News Updates in Marathi)

केन विल्यमसनचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आजपासून ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथमकडे साेपविण्यात आले आहे. टॉम लॅथमने यापुर्वी देखील विल्यमसन दुखापतीमुळे मैदानाबाहेर असताना संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे या कसाेटी सामन्यात संघ उत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विल्यमसनच्या जागी हॅमिश रदरफोर्डचा (Hamish Rutherford) न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले “आमच्यासाठी ही खूप वाईट बातमी आहे. महत्त्वाच्या सामन्याच्या आदल्या दिवशी विल्यमसनला कोरोनाची लागण झाली आणि त्याला या सामन्यातून बाहेर पडावे लागले. दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यामुळे तो नक्कीच निराश झाला असेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT