कर्जदारांना फटका; देशातील सात बॅंकांनी वाढविला व्याजदर

देशातील सात बॅंकांनी घेतला व्याजदर वाढविण्याचा निर्णय
hike in interest rate, repo rate hike
hike in interest rate, repo rate hikesaam tv
Published On

नवी दिल्ली : अनियंत्रित चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (rbi) रेपो दर (rbi repo rate) वाढविण्यावर नुकतेच शिक्का माेर्तब केले. मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ झाली हाेती. काही दिवसांपुर्वी झालेल्या MPC बैठकीनंतर (RBI MPC Meet June 2022) आरबीआयने पुन्हा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे दाेन महिन्यांत रेपो दर ०.९५ टक्क्यांनी वाढून ४.९० टक्क्यांवर पोहोचला. रेपो दरात वाढ हाेताच अवघ्या २४ तासांत देशातील सात बँकांनी त्यांचे व्याजदर (interest) वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे कर्जदारांच्या ईएमआयची रक्कम वाढणार हे निश्चित झाले आहे. (seven banks announced to increase the interest rates after repo rate increased by 0.90 percent)

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) : रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर ICICI बँकेने गुरुवारी बेंचमार्क कर्ज दर 0.50 टक्क्यांनी वाढवून 8.60 टक्के केला. ICICI बँकेने त्यांच्या संकेतस्थळावर एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) चा वाढलेला दर 8 जूनपासून लागू झाला आहे असे नमूद केले आहे. यासोबतच बँकेने एमसीएलआरमध्येही वाढ केली आहे. MCLR चे वाढलेले दर एक जूनपासून लागू झाले आहेत. एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR सध्या अनुक्रमे 7.30 टक्के आणि 7.35 टक्के आहे. सुधारित MCLR सहा महिन्यांसाठी 7.50 टक्के आणि वर्षासाठी 7.55 टक्के आहे.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) : बँक ऑफ बडोदाने बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (BRLLR) वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हा दर ७.४० टक्क्यांवर पोहोचल्याचे बँकेने म्हटले आहे. यामध्ये 4.90 टक्के आरबीआयच्या रेपो रेटचा भाग आहे. याशिवाय, बँकेने 2.50 टक्के मार्कअप जोडले आहे. नवीन दर गुरुवारपासून (ता. 9 जून) लागू झाले आहेत असे बँक ऑफ बडोदाने स्पष्ट केले आहे.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) : पंजाब नॅशनल बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) वाढवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने आता रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.40 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. PNB चे वाढलेले व्याजदर देखील गुरुवारपासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ इंडिया (Bank of India) : बँक ऑफ इंडियानेही व्याजदर वाढवण्याबाबतची माहिती संकेतस्थळावर नमूद केली आहे. रेपो बेस्ड लेंडिंग रेट (RBLR) 7.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4.90 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

एचडीएफसी लिमिटेड : (HDFC Limited) : एचडीएफसी लिमिटेडने गृहकर्जासाठी बेंचमार्क रिटेल प्राइम लेंडिंग रेट (आरपीएलआर) वाढविला आहे. HDFC लिमिटेडचे ​​समायोज्य दर गृह कर्ज (ARHL) या दरावर आधारित आहेत. कंपनीने हा दर 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढलेले व्याजदर आजपासून लागू झाले आहेत.

इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) : इंडियन ओव्हरसीज बँकेने नियामक फाइलिंगमध्ये व्याजदर वाढवण्याबाबत माहिती दिली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 4.90 टक्के रेपो दर आणि 2.85 टक्के मार्जिन समाविष्ट आहे. वाढलेले व्याजदर आजपासून लागू झाले आहेत.

एचडीएफसी बँक (HDFC Bank) : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने गृहकर्ज ते वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. मात्र, या बँकेने आरबीआयच्या घोषणेपूर्वीच व्याजदरात वाढ केली होती. बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 0.50 टक्क्यांनी वाढवून 7.40 टक्के केला आहे. याशिवाय आरएलएलआरवर आधारित नसलेल्या इतर कर्जाच्या व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com