kane williamson saam tv
Sports

Kane Williamson Captaincy: T-20 WC मधील फ्लॉ शो नंतर केन विलियम्सनने कर्णधारपद सोडलं! घेतला आणखी एक मोठा निर्णय

Kane Williamson News In Marathi: न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत न्यूझीलंडला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. एकापेक्षा एक स्टार खेळाडू असूनही या संघाला स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश करता आलेला नाही. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापूर्वीच ट्रेन्ट बोल्टने शेवटचा वर्ल्डकप असल्याची घोषणा केली होती.

आता कर्णधार केन विलियम्सननेही त्याची वाट धरली आहे. या स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर केन विलियम्सनने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासह त्याने सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट घेण्यासही नकार दिला आहे. यापू्र्वी त्याने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने हा मोठा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

न्यूझीलंडचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंड संघाने २०२१ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंड संघाने दमदार खेळ केला. त्याच्या नेतृ्त्वात न्यूझीलंड संघाने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये फायनलपर्यंत मजल मारली आहे. त्याने केवळ कर्णधारपदावरुन माघार घेतली आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे तो तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसेल.

सेन्ट्रल कॉन्ट्रक्ट घेण्यास का दिला नकार?

केन विलियम्सनने सेन्ट्रल कॉन्ट्रक्ट नाकारण्याचं कारण देखील समोर आलं आहे. त्याने परदेशी कॉन्ट्रक्टवर सही केली आहे. त्यामुळे तो उन्हाळ्यात होणाऱ्या मालिकांसाठी उपलब्ध राहु शकणार नाही. याच कारणामुळे त्याने सेन्ट्रल कॉन्ट्रक्ट नाकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा हप्ता येणार; समोर आली अपडेट

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

SCROLL FOR NEXT