kamindu mendis  twitter
क्रीडा

Kamindu Mendis Record: कामिंदू मेंडिसचा श्रीलंकेत राडा! 74 वर्षांनंतर कसोटीत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

Ankush Dhavre

श्रीलंकेचा २५ वर्षीय फलंदाज कमिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमध्ये राडा केला आहे. २०२२ मध्ये कामिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याला ८ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १००४ धावांचा पल्ला गाठला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १८२ धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

कामिंदू मेंडिस सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने हा कारनामा आपल्या १३ व्या इनिंगमध्ये करुन दाखवला आहे. यासह कसोटीत सर्वात जलद १००० धावा करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडच्या सटक्लिफ आणि वेस्टइंडीजच्या एवर्टन वीक्सने हा कारनामा १२-१२ इनिंगमध्ये केला होता. या रेकॉर्डमध्ये तो संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

कामिंदू मेंडिसने न्यूझीलंडचा फिरकीपटू रचिन रविंद्रच्या गोलंदाजीवर षटकार खेचत कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. ज्यावेळी त्याने १००० धावा पूर्ण केल्या. त्यावेळी तो १८१ धावांवर फलंदाजी करत होता. कामिंदू मेंडिसने हा पल्ला गाठताच धनंजय डि सिल्वाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. मेंडिसच्या या खेळीच्या बळावर श्रीलंकेचा संघ या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ५ गडी बाद ६०२ धावांवर डाव घोषित केला.

कामिंदू मेंडिसने रचला इतिहास

कामिंदू मेंडिस १९५० नंतर म्हणजेच ७४ वर्षांनंतर १३ इनिंगमध्ये १००० धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे. यासह २०२४ मध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्डही मेंडिसच्या नावावर आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटला मागे सोडलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT