Kabul Stadium Explosion Latest News SAAM TV
Sports

Kabul Stadium Explosion: लाइव्ह टी-२० मॅच सुरू असतानाच स्टेडियममध्ये स्फोट, त्यानंतर...

लाइव्ह सामना सुरू होता. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उपस्थित होते, त्याचवेळी मैदानात ही घटना घडली.

Nandkumar Joshi

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट असली तरी क्रिकेटवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आली नाही. मात्र, क्रिकेटपटू किती सुरक्षित आहेत, याबाबत साशंकता आहे. काबुल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये अफगाणिस्तानच्या शपागीजा टी-२० लीगमधील एका सामन्यावेळी मोठा स्फोट झाला. (Kabul Stadium Explosion Latest News)

टी २० सामना (T-20) सुरू असतानाच क्रिकेटच्या (Cricket) मैदानातच स्फोट झाला. यात चार प्रेक्षक जखमी झाले आहेत. हा सामना पामीर जाल्मी आणि बंद ए अमिर ड्रॅगन्स या दोन संघांमध्ये सुरू होता. या सामन्यात अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कप (World Cup) स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश होता. सुदैवाने या स्फोटात यातील कुणीही खेळाडू जखमी झालेला नाही.

लाइव्ह सामना सुरू असतानाच झालेल्या स्फोटानंतर काही वेळात स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंना बंकरमध्ये नेण्यात आले. जेव्हा हल्ला झाला तेव्हा संयुक्त राष्ट्राचे अधिकारीही स्टेडियममध्ये उपस्थित होते. सामना एक तास थांबवावा लागला. पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी एका क्रीडा वृत्त संकेतस्थळाला माहिती देताना सांगितले की, स्फोटानंतर काही वेळाने काबुल पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्टँड्समध्ये स्फोट झाला होता, ती जागा रिकामी करण्यात आली. त्यानंतर तिथे पाहणी केली. एका तासानंतर सामना पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

शपागीजा टी २० लीगमधील या सामन्यात अफगाणिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडू खेळत होते. विश्वकप स्पर्धेत हिरो ठरलेला शपूर जादरान पामीर जाल्मी संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यासह दौलत जादरान हा देखील होता. मोहम्मदुल्ला नजीबउल्लाह, जो यावर्षीच्या अंडर १९ विश्वकप स्पर्धेत संघासमवेत होता. या खेळाडूंसह अफताब आलम, करीम जानत कामरान आदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT