jos buttler, England vs Afghanistan/twitter saam tv
Sports

Jos Buttler Statement: दारूण पराभवानंतर इंग्लिश कर्णधार भडकला! सामन्यानंतर या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

England vs Afghanistan : दारूण पराभवानंतर इंग्लिश कर्णधाराने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Jos Buttler Statement, England vs Afghanistan:

गतविजेत्या इंग्लंड संघावर अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला ६९ धावांनी धूळ चारली. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार निराश असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने परभवाचं कारण सांगितलं आहे.

पराभवानंतर काय म्हणाला इंग्लंडचा कर्णधार?

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर जोस बटलर म्हणाला की, ' अफगानिस्तानच्या खेळाडूंनी आम्हाला प्रत्येक क्षेत्रात मागे सोडलं. आम्ही गोलंदाजीसह फलंदाजीतही ठरलेल्या रणनीतीनुसार कामगिरी करू शकलो नाही. अफगाणिस्तानकडे कौशल्यवान गोलंदाजांची फौज आहे. मला असं वाटलं होतं की, संध्याकाळच्या वेळी मैदानावर दवाचं प्रमाण वाढेल. मात्र असं काही झालं नाही. त्यांनी चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली. त्यामुळे आम्हाला धावा करण्याची संधी मिळाली नाही. हे पराभव पुढे जाऊन महागात पडू शकतात.' (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्हाला आमच्या कमकुवत बाजूंवर काम करावं लागेल. आमच्या संघात उत्तम खेळाडू आहेत. मात्र सर्वांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही दमदार कमबॅक करू. जेव्हा खेळाडूंवर दबाव असतो त्यावेळी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली पाहिजे. '

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २८४ धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २८५ धावांची गरज होती. मात्र इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या २१५ धावांवर संपुष्टात आला. गेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT