IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या, म्हणे 'वर्ल्डकपपेक्षा ही BCCI ची स्पर्धा वाटते...'

Micky Arther Statement: या सामन्यानंतर मिकी आर्थरने मोठं वक्तव्य केलं आहे.
Micky arther
Micky arthersaam tv
Published On

Micky Arther Statement:

अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यासाठी अहमदाबादच्या मैदानावर सव्वा लाख भारतीयांनी हजेरी लावली होती. स्टेडियमध्ये निळ्या रंगाची जर्सी घातलेले फॅन्स एकच जल्लोष करताना दिसून आले.

या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर पाकिस्तानचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट मिकी आर्थर यांनी भारत- पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मिकी आर्थर म्हणाले की,'पाकिस्तानच्या पराभवावर मला कोणतंही कारण द्यायचं नाही. मात्र, अहमदाबादमधील वातावरण पाहता ही आयसीसीची स्पर्धा नव्हे तर बीसीसीआयने आयोजित केलेला कार्यक्रम वाटत होता. पाकिस्तान संघाचे गाणं आम्हाला एकदाही स्टेडियममध्ये ऐकायला मिळालं नाही. संपूर्ण स्टेडियममध्ये निळ्या रंगाची जर्सीच दिसत होती. पाकच्या चाहत्यांची भारतात येण्याची इच्छा व्हीजामुळे पूर्ण होऊ शकली नाही.' (Latest sports updates)

Micky arther
IND vs PAK: मोठ्या मनाचा विराट! सामन्यानंतर बाबरला दिलं खास गिफ्ट

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानने तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली.

या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सिराजने पाकिस्तानी कर्णधाराला बाद करत ही भागीदारी तोडली. बाबर आझम बाद होताच सव्वा लाख प्रेक्षक एकच जल्लोष करताना दिसून आले.

Micky arther
Rohit Sharma Records: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! एकाच इनिंगमध्ये मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड

या डावात बाबर आझमने ५० तर मोहम्मद रिजवानने ४९ धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

पाकिस्तानने भारतीय संघासमोर जिकंण्यासाठी १९२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com