sachin tendulkar saam tv
क्रीडा

Most Test Run: सचिनचा महाविक्रम मोडण्यासाठी ४ दिग्गजांमध्ये चढाओढ! जो रुट सर्वात जवळ, विराट कोहली कुठे?

Ankush Dhavre

अशक्य असं काहीच नसतं. ज्यावेळी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ज्यावेळी वनडे क्रिकेटमध्ये ५० शतकांचा डोंगर सर केला होता, त्यावेळी हा रेकॉर्ड स्वप्नातही मोडला जाणार नाही, असं वाटलं होतं.

मात्र विराट कोहलीने हा रेकॉर्ड मोडून काढला होता. हा रेकॉर्ड मोडला गेला असला, तरी सचिनच्या नावे अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे, जे आजही मोडून काढणं अनेकांसाठी स्वप्नच आहे.

मात्र इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट सचिनचा मोठा रेकॉर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. काय आहे रेकॉर्ड? कोणाला आधी हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे? जाणून घ्या.

काय आहे सचिनचा रेकॉर्ड?

सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आहे. त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या रेकॉर्डची नोंद आहे. त्यापैकीच एक रेकॉर्ड म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड.

सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचं झालं, तर २०० कसोटी सामने खेळणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. यादरम्यान सचिनने ५३.८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५१ शतक आणि ६८ अर्धशतकं झळकावली आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सचिनच्याच नावावर आहे. मात्र विराट कोहली, जो रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन यांना हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. हे चारही फलंदाज शर्यतीत असले तरीदेखील जो रुटला हा रेकॉर्ड मोडून काढण्याची सर्वात जास्त संधी आहे.

विराट कोहली

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. विराटने अनेक मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे सोडलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या विराटने परदेशात जाऊनही भारतीय संघासाठी महत्वपूर्ण खेळ्या केल्या आहेत.

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ११३ सामन्यांमध्ये ४९.१ च्या सरासरीने ८८४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २९ शतक आणि ३० अर्धशतकं झळकावली आहेत.

सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये अव्वल स्थानी येण्यासाठी त्याला ७०७३ धावांची गरज आहे. विराट कोहलीला सचिनच्या या रेकॉर्डजवळ पोहोचणं जरा कठीण आहे. कारण या रेकॉर्डच्या जवळ पोहोचण्यासाठी त्याला इथून पुढे ५ वर्ष तरी क्रिकेट खेळावं लागेल.

जो रुट

इंग्लंडचा फलंदाज जो रुट सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात बॅक टू बॅक शतक झळकावलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३३ वं शतक ठरलं आहे. मुख्य बाब अशी की, गेल्या २ वर्षातील हे त्याचं कसोटी क्रिकेटमधील १६ वं शतक ठरलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीतही त्याने मोठी आघाडी घेतली आहे. जो रुटने आतापर्यंत एकूण १४४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५०.३ च्या शानदार सरासरीने १२१३१ धावा केल्या आहेत.

दरम्यान सचिनला सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये मागे सोडण्यासाठी त्याला अवघ्या ३६४७ धावांची गरज आहे. जो रुट ३३ वर्षांचा आहे. इथून पुढे जर ५ वर्षही त्याने क्रिकेट खेळणं सुरु ठेवलं, तरी हा रेकॉर्ड तो सहज मोडून काढू शकतो. त्यामुळे जो रुट हा रेकॉर्ड मोडून काढण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

केन विलियम्सन

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सनही फॅब ४ फलंदाजांपैकी एक आहे. केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघाच्या पाठीचा मनका आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो, तेव्हा केन विलियम्सन आपल्या संघाला संकटातून बाहेर काढत असतो.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्ड मोडून काढण्यासाठी केन विलियम्सन देखील शर्यतीत आहे. केन विलियम्सनने आतापर्यंत १०० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५५ च्या सरासरीने ८७४३ धावा केल्या आहेत. त्याला सचिनला मागे सोडण्यासाठी ७१७८ धावांची गरज आहे.

स्टीव्ह स्मिथ:

सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी स्टीव्ह स्मिथ देखील प्रबळ दावेदार आहे. स्मिथने गेल्या काही वर्षांत शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. स्मिथच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०९ सामन्यांमध्ये ९६८५ धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने ३२ शतक आणि ४१ अर्धशतकं झळकावली आहेत. सर्वाधिक धावांच्या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे सोडण्यासाठी त्याला अजूनही ६२३६ धावा करायच्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT