गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हे उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कळेलच. पण त्यापूर्वी सकाळचा एक्झिटपोल समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, तरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पारडं जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रविकांत बोपचे यांनी निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधात भाजपकडून विजय रहांगडाले यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये या दोघांमध्येच प्रमुख लढत झाली असून रविकांत बोपचे यांचे पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळच्या एक्झिट पोलनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रविकांत बोपचे हे संभाव्य आमदार होऊ शकतात. रविकांत बोपचे हे विजय रहांगडाले यांचा पराभव करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपसोबत महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवाराला रिंगणात उभे केले होते. या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली होती त्यानंतर चित्र बदललेले पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.