Usain Bolt Saamtv
Sports

बाबो! उसेन बोल्टला 440 वोल्टचा झटका, खात्यातून तब्बल 98 कोटी गायब, शिल्लक राहिले फक्त इतके...

जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू आणि वेगाचा बादशहा उसैन बोल्ट आता कंगाल झाला आहे. त्यांची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले आहेत

Gangappa Pujari

Usain Bolt: जमैकाचा वेगवान धावपटु उसेन बोल्टबाबतची एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू आणि वेगाचा बादशहा उसैन बोल्ट आता कंगाल झाला आहे. त्यांची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले आहेत.

लंडन ते बीजिंगच्या रेस ट्रॅकवर धावणाऱ्या बोल्टसोबत जे काही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने 8 वेळा सुवर्णपदक जिंकलं आहे. निवृत्तीनंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. उसैन बोल्टची 12.7 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 98 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, उसेन बोल्ट यांच्या वकिलांनी एका पत्रकात याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. 11 जानेवारी 2023 रोजी उसेन बोल्टला आपल्या खात्यातील फंड गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील बुधवारी त्याच्या वकिलाने कंपनीकडे या पैशांची मागणी केली, त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा झाला.

उसेन बोल्टचं हे खातं स्टॉक्स अण्ड सिक्योरिटीज लिमिटेड (SSL) कंपनीसोबत होते. खेळाडूच्या वकिलांनी कंपनीकडे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. (Financial Scame)

बोल्टच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांच्या आतमध्ये कंपनीने पैसे माघारी केले नाहीत, तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.' वकिलांनी कंपनीला आठ दिवसांचा वेळ दिला आहे. जर कंपनीने निर्धारित वेळेत पैसे माघारी दिले नाहीत, तर बोल्ट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. बोल्टच्या खात्यात जवळपास 12.8 मिलिअन डॉलर इतकी रक्कम होती. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बोल्टच्या खात्यात आता फक्त 12 हजार डॉलर इतकीच रक्कम बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT