Surabhi Jayashree Jagdish
शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही. मुलींसाठी शॉपिंग म्हटलं की, त्यांचा आवडीचा विषय. मात्र अनेकदा आपल्यावर काही ठराविक कपडे सूट होतील का असा प्रश्न त्यांच्या मनात असतो. असाच एक प्रश्न म्हणजे स्लिवलेस घ्यायचं की स्लीव्ह्स टॉप?
पण फक्त बॉडी टाइप नाही, तर हात आणि मनगटाचं प्रमाण पाहिलं तर योग्य पर्याय सहज ठरवता येतो. खाली दिलेल्या सोप्या मोजमापाच्या फॉर्म्युल्याने तुम्हालाच कळेल, तुमच्यावर काय जास्त सूट होतं.
खांद्याखालून हाताच्या जाड भागाचा घेर इंचात मोजा. हा भाग म्हणजे वरच्या हाताचा सर्वात भरलेला भाग असतो. हे मोजमाप म्हणजेच तुमचं Arm Value आहे.
मनगटाचा सगळ्यात बारीक भाग इंचात मोजा. टेप घट्ट न ओढता आरामात मोजा. हे मोजमाप म्हणजे Wrist Value मानलं जातं.
आता माप घेतल्यानंतर Arm Value ला Wrist Value ने भागा. उदा. Arm Value 12 इंच आणि Wrist Value 5 इंच असेल. 12 ÷ 5 = 2.4 असा आकडा येईल.
जर उत्तर 2.5 पेक्षा जास्त असेल तर स्लीव्ह्स टॉप्स जास्त सूट होतात. हात झाकलेले असल्यामुळे शरीराचा समतोल छान दिसतो. फुल स्लीव्ह्स, थ्री-फोर्थ स्लीव्ह्स उत्तम पर्याय ठरतात.
जर उत्तर 2 पेक्षा कमी असेल तर स्लिवलेस टॉप्स तुमच्यावर छान दिसतात. हात बारीक दिसतात आणि बॉडी प्रपोर्शन सुंदर वाटतं. हॉल्टर, कट-स्लीव्ह किंवा स्लीवलेस टॉप्स निवडू शकता.
जर उत्तर 2 ते 2.5 दरम्यान असेल तर दोन्ही स्टाइल्स चालतात. स्लीव्ह्स आणि स्लिवलेस दोन्ही तुमच्यावर equally सूट होतात. तुम्ही फॅशन आणि कम्फर्टनुसार निवड करू शकता.