Manasvi Choudhary
चिनी लोकांच्या डोळ्यांवरून नेहमीच सर्वत्र चर्चा होत असते. तुम्हीही पाहिले असेल की चिनी लोकांचे डोळे लहान असतात.
चिनी लोकांचे डोळे हे सर्वसामान्यापेक्षा आकाराने लहान असतात. चिनी लोकांचे डोळे लहान का असतात यामागचे नेमके कारण काय आहे?
असं म्हटलं जातं की चिनी लोकांचे डोळे हे नैसर्गिक आणि अनुवंशिकरित्या लहान आहे. तर काही वैज्ञानिकांनी देखील यावर सांगितलं आहे. अनुवांशिकता म्हणून पिढ्यानपिढ्या पूर्वजांकडून मिळालेले गुणधर्म असावे असे देखील काहींचे मत आहे.
चिनी लोकांच्या डोळ्यांच्या वरच्या पापणीवर एपिकॅन्थिक फोल्ड नावाचा थर असतो जो डोळ्यांच्या आतील कोपरा झाकून टाकतो यामुळे चिनी लोकांचे डोळे छोटे असतात.
पूर्वी अशियातील काही भागात प्रचंड थंडी, बर्फाळ वाऱ्यापासून डोळ्यांचे रक्षण व्हावे यासाठी अशी रचना झाली असावी.
चिनी लोकांच्या पापण्यांमध्ये चरबी अधिक असते जी डोळ्यांना थंडीपासून उबदार ठेवण्याचे काम करते यामुळे चिनी लोकांचे डोळे लहान असतात.
चिनी लोकांचे डोळे लहान असण्यामागील सत्य कारण अद्याप समजू शकले नाही. येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.