Uday Samant : थरारक घटना! उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले; भर समुद्रात अचानक बंद पडली बोट

राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली.
Uday Samant
Uday SamantSaam TV
Published On

Uday Samant Speed Boat News : रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. समुद्रातून बोटमधून प्रवास करत असताना, राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली. अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली. सुदैवाने उदय सामंत हे सुखरूप आहे. (Maharashtra Political News)

Uday Samant
Shinde vs Thackeray : एकनाथ शिंदेंचं पद बेकायदेशीर; ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

नेमकं काय घडलं?

राज्याचे आरोग्यमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे रायगडमधून गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने स्पीड बोटमधून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या स्पीड बोटीचे अचानक इंजिन बंद पडले. त्यामुळे समुद्रातील लाटांमुळे त्यांची बोट भरकटली. बोट बंद पडल्यामुळे बोटीच्या सर्व यंत्रणा देखील बंद पडल्या.

त्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ SOS हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठीण झाले होते. समुद्रात अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट (Boat) बोलवली.

Uday Samant
Viral News : १६ वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं शिक्षिकेचं प्रेम; नंतर जे घडलं ते चक्रावून टाकणारं

दरम्यान, काही वेळातच, घटनास्थळी दुसरी बोट दाखल झाली. त्यामुळे उदय सामंत यांच्या भरकटत चाललेल्या स्पीड बोटीला वेळेवर मदत मिळाली. सुदैवाने या घटनेत उद्योगमंत्री उदय सामंत हे बालबाल बचावले. दुसऱ्या बोटीवर चढताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आता ते मुंबईत आल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com