Viral Video X
Sports

Viral Video : गर्लफ्रेंडसमोर बायकोला पळवून-पळवून मारलं; केस ओढले, तब्बल १६ वेळा कानशिलात लगावली

Man Beat His Wife Infront Of Girlfriend : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गर्लफ्रेंडसमोर त्याच्या बायकोला मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

Video : एका महिलेने तिच्या नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले. रागाच्या भरात महिलेच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली. केस धरुन तिला रस्त्यावरुन ओढत नेले. रस्त्याच्या मध्यभागी महिलेला १६ वेळा कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशमधील झाशी येथे ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे नाव मोहिनी यादव असे आहे. मोहिनीच्या नवऱ्याचे नाव शिवम असल्याची माहिती समोर आली आहे. मोहिनीने शिवमला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पकडले. जाब विचारल्यानंतर शिवमने मोहिनीला रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करताना शिवम शिवीगाळ करत असल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकायले मिळते.

मारहाणीमुळे मोहिनीला गंभीर दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. मोहिनीला मारहाण केल्यानंतर शिवमने तिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ढकलले आणि त्यानंतर शिवम गर्लफ्रेंडसह दुचाकीवरुन पळून जात असल्याचे पाहायला मिळते. या घटनेनंतकर मोहिनीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मोहिनी आजारपणामुळे मागील दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल होती. औषधे घेण्यासाठी ती मेडिकल स्टोअरमध्ये जात होती. तेव्हा तिने शिवम आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिले. जाब विचारला गेल्यानंतर शिवम मोहिनीला मारहाण करु लागला. माझ्या डोक्यावर शिवमने काठीनेही मारल्याचा दावा मोहिनीने केला आहे. व्हिडीओ व्हायरल होत असल्याने या घटनेची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT