ICC on Death of Afghan Cricketers x
Sports

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Afghan Cricketers : पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेटपटू ठार झाले. या हल्ल्याचा आयसीसीसह बीसीसीआयने निषेध केला आहे. घटनेमुळे पाकिस्तानवर कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाण क्रिकेटपटू ठार

  • क्रिकेट विश्वात संतापाची लाट पसरली

  • आयसीसीसह बीसीसीआयने केला निषेध

ICC on Death of Afghan Cricketers : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षामध्ये अनेक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील क्रिकेटपटू मारले गेले. घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. हल्ल्याच्या निषेधार्थ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्यास नकार दिला. बीसीसीआयने देखील अफगाणिस्तानच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या कृतींचा तीव्र निषेध केला. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही दुःख व्यक्त केले.

मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला आहे. शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाने काही क्लब क्रिकेटर्ससह निवासी क्षेत्रांना लक्ष्य केले. हल्ल्यामध्ये अनेक क्रिकेटपटूंचा नाहक बळी गेला. या घटनेने क्रिकेट विश्वात संताप व्यक्त केला जात आहे.

अफगाणिस्तानवर झालेल्या हल्ल्यावर आयसीसीने निवेदन जारी केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांची कृती मूर्खपणाची असल्याचे म्हटले. 'अफगाण क्रिकेटपटू कबीर आघा, सिबगतुल्लाह आणि हारून यांच्या हिंसाचारात झालेल्या मृत्यूने मला खूप दुःख झाले आहे. अशा तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंचा मृत्यू हा अफगाणिस्तानच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगासाठी मोठा धक्का आहे. या कठीण काळात आपण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबत आहोत', असे जय शाह यांनी म्हटले.

बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक लांबलचक निवेदन जारी करुन अफगाणिस्तानवरील हल्ल्याचा निषेध केला. या निवेदनात पाकिस्तानच्या कृतीला बीसीसीआयने भ्याड हल्ला असे म्हटले. बोर्डाचे सचिव देवजीत सैकिया यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. यामुळे आता पाकिस्तानविरुद्ध कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT