Jasprit bumrah  saam tv
Sports

IND VS IRE 3rd T2OI: 'हे खूप निराशाजनक होतं..' मालिका जिंकूनही कॅप्टन बुमराह या कारणामुळे नाराज

IND VS IRE 3rd T2OI, Jasprit Bumrah Statement: मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे धुतला गेला. यासह भारतीय संघाने ही मालिका २-० ने खिशात घातली आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah Statement After India vs Ireland 3rd T20I:

भारत विरुद्ध आयर्लंड या दोन्ही सामन्यांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे धुतला गेला. यासह भारतीय संघाने ही मालिका २-० ने खिशात घातली आहे.

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवला होता.

ही मालिका कर्णधार जसप्रीत बुमराहसाठी कमबॅक मालिका ठरली. सप्टेंबर २०२२ मध्ये तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. मात्र आता वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असताना त्याने दमदार कमबॅक केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की, ' सामना कधी होईल याची वाट पाहणं निराशाजनक होतं. असं काही होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. कारण सामना सुरू होण्यापूर्वी वातावरण चांगलं होतं. संघाचं नेतृत्व करणं ही अभिमानास्पद बाब आहे. जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा ही खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळत होता. मी दुखापतीचा विचार करत नाही. जेव्हा संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळते तेव्हा आपण नेहमीच या गोष्टीचा स्वीकार करत असतो. एक क्रिकेटपटूला नेहमीच ही जबाबदारी घ्यायला आवडतं.' (Latest sports updates)

या मालिकेत मालिकावीर म्हणून निवड झालेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या दुखपतीबाबत बोलताना म्हटले की, ' सर्व काही ठीक आहे. आता कुठलीही तक्रार नाही.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. अनेक सकारात्मक बाबी देखील आहेत. भारतीय संघ जिथे जातो तिथे चांगलं क्रिकेट खेळतो. '

आयर्लंड संघाचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने बोलताना म्हटले की, आज सामना झाला असता तर बरं झालं असतं. काही नव्या चेहऱ्यांना खेळण्याची संधी मिळाली. ही वर्ल्डकपची तयारी आहे. अजून १० महिने शिल्लक आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT