jasprit bumrah twitter
Sports

IND vs AUS: 'माझ्या बॅटिंगवर Doubt घेताय?', पत्रकाराने प्रश्न विचारला अन् बुमराहने खणखणीत षटकाराने उत्तर दिलं- VIDEO

Jasprit Bumrah Batting : भारता आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने शानदार फटकेबाजी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवलं आहे. दरम्यान बुमराहची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Ankush Dhavre

ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला होता.

या डावात त्याने ६ गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४४५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाखेर ४ गडी बाद ५१ धावा करता आल्या.

या सामन्यातही भारतीय टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर जसप्रीत बुमराह प्रेस कॉन्फ्रेन्ससाठी आला होता. या प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये बुमराहला भारतीय फलंदाजीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये पत्रकाराने विचारले की, 'गाबामध्येही भारतीय फलंदाचांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. मात्र त्यांचं मुल्यांकन करुन उत्तर देण्यासाठी तू योग्य नाहीस..', पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना बुमराह म्हणाला, 'तुम्ही माझ्या फलंदाजी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात?.. तुम्ही गुगल करुन पाहा, कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे (सर्वच हसू लागले)

प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये फलंदाजांचा बचाव करणाऱ्या बुमराहने आज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलंच झोडपून काढलं. वेगाने येणारे बाऊन्सर चेंडू त्याने खेळून काढले. संघाला गरज असताना त्याने षटकारही खेचला.

भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. शेवटी १ विकेट शिल्लक असताना, भारतीय संघाला आणखी ३३ धावा करायच्या होत्या. त्यानंतर दोघांनी मिळून नाबाद ३९ धावांची भागीदारी केली आणि संघाला फॉलोऑनपासून वाचवलं.

चौथ्या दिवसाखेर भारताने २५२ धावा केल्या आहेत. दरम्यान आकाश दीप २७ तर जसप्रीत बुमराह १० धावांवर नाबाद आहे.

या डावात फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली.

तर रविंद्र जडेजा ७७ धावा करत माघारी परतला. शेवटी बुमराह १० तर आकाश दीप २७ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ९ गडी बाद २५२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया या डावात १९३ धावांनी आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT