jasprit bumrah
jasprit bumrah Saam Tv
क्रीडा | IPL

एक मॅच खेळाला नाही, पण जसप्रीत बुमराहला मोजावी लागली मोठी किंमत

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : टीम इंडियाने १७ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध (England) झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवला, पण तीन दिवसीय सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बाहेर बसावे लागले होते. या एका सामन्यात बाहेर बसावे लागल्याने बुमराहला मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्याला जागतिक क्रमवारीतील नंबर १ चे स्थान गमवावे लागले आहे. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हे स्थान मिळवले आहे. (jasprit bumrah Latest News)

आयसीसीने (ICC) २० जुलै रोजी एकदिवसीय गोलंदाजांची नवीन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये ट्रेंट बोल्ट ७०४ गुणांसह नंबर १ गोलंदाज ठरला आहे. तर बुमराह ७०३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. दोघांमध्ये फक्त एका गुणाचा फरक आहे.

बुमराह जखमी असल्याने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे त्याला बाहेरच बसावे लागले. यामुळेच ट्रेंट बोल्ट १ नंबरचे स्थान गाठले. वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह हा एकमेव भारतीय आहे, ज्याचा टॉप-१० मध्ये समावेश आहे. टॉप-२० मध्ये बुमराह व्यतिरिक्त फिरकीपटू युजवेंद्र चहलचाही समावेश आहे, जो सध्या १६ व्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडेमध्ये बुमराहने जोरदार कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने १९ धावांत ६ बळी घेतले. यामुळे टीम इंडियाने हा सामना १० गडी राखून जिंकला. यानंतर बुमराहने मालिकेतील दुसऱ्या वनडेत दोन विकेट घेतल्या. त्याला दुखापतीमुळे मालिकेतील शेवटचा सामना खेळता आले नाही.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्थान गमावले आहे. तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तर इंग्लंडविरुद्ध वनडेत शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रुस व्हॅन डर डुसेनने ४ च्या स्थानावर झेप घेतली असून तो तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

SCROLL FOR NEXT