Jasprit Bumrah Saam tv
क्रीडा

Jasprit Bumrah: हार्दिकच्या एन्ट्रीने मुंबई इंडियन्समध्ये खिंडार? जसप्रीत बुमराहने इन्टाग्रामवर MI ला केलं अनफॉलो

Vishal Gangurde

jasprit bumrah Latest News:

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. यासाठी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात १५ कोटींचा ट्रेड झाला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री केल्याने जसप्रीत बुमराह नाराज असल्याचीही चर्चा आहे. जसप्रीतने इन्टाग्रामवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. (Latest Marathi News)

IPL ट्रेड खऱ्या अर्थानं हार्दिक पंड्याच्या खरेदीवरून गाजला. मुंबई इंडियन्सनं ट्रेडमध्ये यॉर्कर टाकला आणि गुजरात टायटन्सचा थेट त्रिफळाच उडवला आहे. म्हणजे संघाच्या कर्णधारालाच म्हणजेच हार्दिक पंड्यालाच गुजरातच्या नाही, तर मुंबईच्या तंबूत परत आणलं आहे. त्यासाठी मुंबईनं तब्बल १५ कोटी मोजले आहेत. पण हार्दिकचं मुंबईत येणं बहुतेक मुंबईच्या यॉर्कर किंग पटलं नसावं अशी दबकी चर्चा आहे.

तुम्ही म्हणाल हे काय नवीन? हीच तर खरी गंमत आहे. बुमराहनं सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. त्यात कधीकधी शांत राहणं हे बेस्ट उत्तर आहे, असं म्हटलंय. पण बुमराहचं शांत राहणं ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना? अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.

रोहितनंतर कॅप्टन्सीसाठी बुमराह हाच मुख्य पर्याय होता, असं काहींचं म्हणणं आहे. मात्र आता अचानक पंड्या संघात आल्यानं बुमराह नाराज झाला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावरून अनफॉलो केलंय, असं वृत्त आहे. दुसरीकडं मुंबई इंडियन्समध्ये कुछ तो गडबड है...अशी चाहत्यांना शंका आहे. त्यात बुमराह आरसीबीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT