जसप्रीत बुमराहने हरिस रऊफला बाद करत "फ्लाइट लँड" सेलिब्रेशन केलं
रउफच्या सेलिब्रेशननंतर आयसीसीने त्याला 30% सामन्याच्या फीचा दंड ठोठवला होता.
बुमराहच्या सेलिब्रेशनवर इरफान पठानने “फ्लाइट लँड करा दी” म्हणत दिली प्रतिक्रिया
टीम इंडियाने पाकिस्तानला १४६ धावांवर रोखलं
Asia Cup 2025, IND vs PAK: आशिया कपच्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. जसप्रीत बुमरहाने हारिस रउफने बाद करत जंगी सेलिब्रेशन केलं. रऊफच्या विमान सेलिब्रेशनला बुमराहने जोरदार प्रत्युत्तर दिलं. बुमराहच्या सेलिब्रेशनचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
जसप्रीत बुमराहने रउफला बाद केल्यानंतर त्याच्याकडे इशारा करत हटके सेलिब्रेशन केलं. सुपर-४ राऊंडच्या भारत-पाक सामन्यात रउफने सेलिब्रेशन केलं होतं. मैदानात चाहत्यांनी रउफला विराट कोहलीच्या नावाने चिडवलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देताना रउफने विमान कोसळण्याची स्टाइल केली होती. या कृत्यामुळे आयसीसीने हारिस रउफला सामन्याच्या फीपैकी 30 टक्के दंड ठोठावला होता.
बुमराहच्या सेलिब्रेशनचं माजी क्रिकेटपटू इरफान पठानने देखील कौतुक केलं. फ्लाइट लँड करा दी, म्हणत इरफान पठानने बुमराहच्या सेलिब्रेशनचं कौतुक केलं. इरफानची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली झाली. पाकिस्तानने ११३ धावांवर पाकिस्तनचा केवळ एकच गडी बाद झाला होता. पाकिस्तानचा पहिला विकेट गेल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघाला १४६ धावांवर गारद केलं. पाकिस्तानने टीम इंडियाला १४७ धावांचं आव्हान दिलं.
टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २-२ विकेट घेतले. कुलदीप यादवने ४ विकेट घेतले. फिरकीपटूंनी पहिले ८ विकेट घेतले. तर शेवटचे दोन विकेट जसप्रीत बुमराहने घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.