
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये मिळवला विजय
सामना शेवटच्या चेंडूपर्यंतरंगला सामना
भारतीय खेळाडूंनी निर्णायक क्षणी दाखवलेली कामगिरी विजयानंतर कौतुकास्पद ठरली.
क्रिकेट चाहत्यांना श्वास रोखून ठेवायल्या लावणऱ्या अतितटीच्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरममध्ये शानदार विजय मिळवला. श्रीलंकेला धूळ चारून टीम इंडियाच्या खेळाडूंनी कौशल्य आणि धैर्याची छाप सोडली. या सामन्यात क्रिकेटप्रेमींना शेवटच्या षटकापर्यंत रंगेलला थरार पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी निर्णायक क्षणी केलेल्या कामगिरीमुळे श्रीलंकेला पराभूत केलं.
आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंकेदरम्यान १८ वा सामना झाला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला. हार्दिक पंड्याने कुसल मेंडिसला बाद केलं. खराब सुरुवात झाल्यानंतर श्रीलंकेची मजल पुढे ४ षटकात ४५ धावांपर्यंत पोहोचली.
संघाचा पहिला गडी बाद झाल्यानंतर निसांका आणि परेराने संघाचा डाव सावरला. दोघांनी १०० धावांची भागीदारी केली. निसांका आणि परेराने २५-२५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. दोघांनी जोरदार फलंदाजी करत टीम इंडियाला जेरीस आणलं.
दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची धुलाई करताना षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला. दोघे खेळाडू जोमात आले असताना वरुण चक्रवर्तीने परेराला बाद करून भागीदारी तोडली. संजू सॅमसनने परेराला स्टंमआऊट केलं. त्यानंतर मैदानात दासून शनाकाने किमया दाखवली.
श्रीलंकेच्या खेळाडूंनी देखील २० षटकात ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हर झाली. या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची फलंदाजी फ्लॉप ठरली. श्रीलंकेने टीम इंडियाला एका षटकात ३ धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने दिलेले अवघ्या ३ धावांचं आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केले. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ गडी १९६ धावा केल्या. या डावात शुभमन गिल ४ धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव देखील १२ धावा करून बाद झाला. शुभमन बाद झाल्याचा परिणाम अभिषेक शर्मावर झाला नाही.
अभिषेक शर्माने या डावात ७ चौकार आणि २ षटकार लगावून २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माने ३१ चेंडूत ६१ धावा केल्या. संजू सॅमसनने २३ चेंडूत ३९ धावा केल्या. अक्षर पटेलने २१ आणि तिलक वर्माने ४९ धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, भारताने दिलेल्या आव्हानाची श्रीलंकेने बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला धूळ चारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.