jasprit bumrah yandex
Sports

Men's Test Bowling Rankings : बुमराह एक नंबर! टेस्ट रँकिंगमध्ये भारताचे आणखी २ धुरंधर

Men's Test Bowling Rankings update : टेस्ट रँकिंगमध्ये भारताचे तीन गोलंदाजांनी स्थान मिळवलं आहे. या रँकिंगमध्ये बुमरहाने पहिली क्रमांक मिळवला आहे.

Vishal Gangurde

ICC Test Rankings : भारताचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कानपूरमध्ये बांगलादेशविरोधात दुसऱ्या कसोटी सामन्यात ६ गडी बाद करणारा बुमराहने फिरकीपटू आर. अश्विनला मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. बुमराहने बांगलादेशविरोधात ६७ धावा देऊन ६ गडी बाद केले होते.

तमिळनाडूचा फिरकीपटू अश्विनने कानपूर टेस्टमध्ये ५ गडी बाद केले. अश्विन टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विन हा बुमराहच्या एक रेटिंग पॉइंटने मागे आहे. रवींद्र जडेजा देखील टॉप १० मध्ये आहे. रवींद्र जडेजा टेस्ट रॅकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.

श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या हा सातव्या क्रमाकांवर पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडविरोधात १८ गडी बाद केले होते. त्याने 'प्लेयर ऑफ द सीरीज'वर देखील नाव कोरलं होतं. या रँकिंगमध्ये एका पाकिस्तानी गोलंदाजाचा देखील समावेश आहे. जलद गोलंदाज शाहीन अफरीदी ७०९ रेटिंग पॉइंट्सने दहाव्या क्रमांकावर आहे.

जयस्वालने दाखवला जलवा

आयसीसीने फलंदाजांची रँकिंग देखील जाहीर केली आहे. भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने कानपूर टेस्टमध्ये चांगली कामगिरी करून बेस्ट रँकिंग मिळवली आहे. त्याने कानपूर टेस्टमध्ये ७२ आणि ५१ धावांची खेळी खेळली. यशस्वीने थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. यशस्वीच्या पुढे जो रुट आमि केन विलियमसन आहेत. तर विराट कोहलीने देखील टॉप १० मध्ये एन्ट्री केली आहे.

सध्या श्रीलंकेचा फलंदाज कामिंडू मेंडिस देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. २६ वर्षीय मेंडिस देकील ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडविरोधात खेळताना चांगली कामगिरी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ, विदर्भाला यलो अलर्ट, वाचा पावसाचा अंदाज

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

SCROLL FOR NEXT