jasprit bumrah saam tv
Sports

Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराह Champions Trophy ला मुकणार? दुखापतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Jasprit Bumrah News In Marathi: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दरम्यान त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे.

या संघात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आलं आहे. मात्र टेन्शन वाढवणारी बातमी अशी की,जसप्रीत बुमराह अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. आता त्याच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शानदार गोलंदाजी केली होती. त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधीही मिळाली होती. दरम्यान सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी होता.

यासह तो मालिकावीर देखील ठरला होता. मात्र चौथ्या कसोटीत गोलंदाजी करताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो पाचव्या कसोटीतील दुसऱ्या डावात तो गोलंदाजीसाठी येऊ शकला नव्हता.

दुखापतग्रस्त असल्यामुळे सध्या तो संघाबाहेर आहे. त्याला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. पूर्णपणे फिट नसल्यामुळे तो इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या २ सामन्यांना मुकणार आहे. यासह तिसऱ्या सामन्यातून तो बाहेर होऊ शकतो.

माध्यमातील वृत्तानुसार, बुमराह न्यूझीलंडचे डॉक्टर रोवन शोटेन यांच्या संपर्कात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जसप्रीत बुमराह संघात असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी बुमराह १०० टक्के फिट व्हावं लागेल.

बुमराह दुखापतीवर ट्रिटमेंट घेण्यासाठी न्यूझीलंडला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र तो या मालिकेतून बाहेर झाल्यास बीसीसीआयने त्याचा बॅकअप तयार ठेवला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT