ben stokes twitter
Sports

Jasprit Bumrah: बुमराहच्या रॉकेट बॉलसमोर स्टोक्सचं सरेंडर! दांडी गुल होताच झाला शॉक- Video

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्सला बोल्ड केलं आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes Clean Bowled On Ben Stokes Bowling:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर संपुष्टात आला आहे.

या सामन्यात इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण इंग्लंडला २५० धावांचा आकडाही पार करता आलेला नाही.

बुमराहने उडवली दांडी..

पहिल्या डावात बेन स्टोक्स आणि जॅक लीच ही जोडी मैदानावर होती. त्यावेळी जसप्रीत बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला होता. बेन स्टोक्स आक्रमक फलंदाजी करत होता. त्यामुळे सर्वांनाच माहित होतं की, बेन स्टोक्स मोठे फटके खेळणार. त्यामुळे रोहितने सर्व खेळाडू मागे ठेवले. त्यामुळे प्रेशरमध्ये येऊन स्टोक्सने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. (Latest sports updates)

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना ६५ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र बुमराहचा चेंडू वेगाने आत आला आणि बेन स्टोक्सची दांडी गुल करुन गेला. दांडी गुल केल्यानंतर स्टोक्सने जी रिअॅक्शन दिली ते पाहून अंदाज लावता येईल की, कुठलाच फलंदाज या चेंडूवर मोठा फटका खेळू शकला नसता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंडचा डाव २४६ धावांवर संपुष्टात..

इंग्लंडचा बॅझबॉल या डावात कामी आला नाही. कारण इंग्लंडला या डावात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची तुफानी खेळी केली. तर बेन डकेटने ३५, जॉनी बेअरस्टोने ३७, जो रुटने २९ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT