jasprit bumrah rohit sharma virat kohli  saam tv
Sports

Jasprit Bumrah Captaincy Record: बुमराहचा रोहित अन् विराटच्या खास क्लबमध्ये प्रवेश! असा कारनामा करणारा ठरला पाचवा भारतीय कर्णधार

India vs Ireland Jasprit Bumrah Record As A Captain: बुमराहने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah New Record In T20I As A Captain:

भारत विरूद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील तिसरा टी-२० सामना डब्लिनच्या द व्हिलेजमध्ये खेळवला जाणार होता.

मात्र हा सामना पावसामुळे धुतला गेला. एकही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना रद्द करण्यात आला. या मालिकेतून कमबॅक करत असलेला जसप्रीत बुमराह या मालिकेचा मालिकावीर ठरला. यासह त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

जसप्रीत बुमराह हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिकावीर पुरस्कार पटकावणारा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने हा कारनामा केला आहे. याबाबतीत माजी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने आतापर्यंत ३ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे. तर सुरेश रैना, रोहित शर्मा,हार्दिक पंड्याने प्रत्येकी १-१ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे. तर जसप्रीत बुमराहने देखील पहिल्यांदाच हा पुरस्कार पटकावला आहे.

जसप्रीत बुमराहचं दमदार कमबॅक...

गेले काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेतून कमबॅक केले आहे. त्याने आयर्लंडविरूद्ध झालेल्या २ टी-२० सामन्यांमध्ये ४ गडी बाद केले आहेत. या दमदार कामगिरीसह जसप्रीत बुमराहला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

या मालिकेत जसप्रीत बुमराहसह रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. या दोघांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद केले. तर या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड अव्वल स्थानी आहे.त्याने या मालिकेतील २ सामन्यांमध्ये ७७ धावा केल्या. तर जयस्वालने २ सामन्यांमध्ये ४२ आणि संजू सॅमसनने ४१ धावा केल्या आहेत . (Latest sports updates)

भारतीय संघाचा २-० ने विजय..

भारतीय खेळाडूंनी या मालिकेत दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे पुर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानूसार भारतीय संघाने या सामन्यात २ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ३३ धावांनी बाजी मारली होती. या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT