Ishan Kishan  Saam tv
Sports

ईशान किशनचं श्रीलंकेत वादळ; मैदानात षटकार-चौकारांचा पाऊस, स्टार खेळाडूचा रेकॉर्डही मोडला

ishan kishan : ईशान किशनचं श्रीलंकेत वादळ पाहायला मिळालं. ईशानने मैदानात षटकार-चौकारांचा पाऊस केला.

Vishal Gangurde

ईशानची वादळी खेळी

ईशानचं सर्वाधिक जलद अर्धशतक

ईशानने शुभमनचा विक्रम मोडला

Ishan Kishan Fifty against Pakistan: पाकिस्तानच्या विरोधात टी २० वर्ल्डकप २०२६ च्या सामन्यात ईशान किशननं वादळ पाहायला मिळालं. त्याने २७ चेंडूत अर्धशतक ठोकत इतिहास रचला. पहिल्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर टेन्शनमध्ये आलेल्या संघाचा डाव ईशानने सावरला. पाकिस्तान गोलंदाजांची धुलाई करताना स्टार खेळाडू शुभमन गिलचा रेकॉर्ड मोडला.

ईशानने भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने पॉवरप्लेमध्ये ४२ धावा केल्या. भारत-पाकिस्तान T20I सामन्यामध्ये पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने ईशान इतक्या धावा केलेल्या नाही. याआधी आशिया कप २०२५ स्पर्धेत दुबईत झालेल्या सामन्यात शुभमन गिलने ३५ धावा केल्या होत्या.

ईशान ४० चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. यात ३ षटकार, १० चौकारांचा समावेश आहे. ईशानला सॅम अयूबने बाद केलं. या सामनाच्या डावात ईशानने आणखी रेकॉर्ड नावावर केला आहे. भारत-पाकिस्तान टी२० सामन्यात सर्वाधिक जलक अर्धशतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

भारत-पाकिस्तान टी20 सामन्यांतील सर्वात जलद अर्धशतक

23 चेंडू - मोहम्मद हफीज, अहमदाबाद, 2012

24 चेंडू - अभिषेक शर्मा, दुबई, 2025

27 चेंडू – ईशान किशन, कोलंबो, 2026

29 चेंडू – युवराज सिंह, अहमदाबाद, 2012

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये भारताने पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात केली. टीम इंडियाने ६ षटकात १ गडी गमावून ५२ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानी कर्णधार सलमान अलीने सामन्याआधी अभिषेकने खेळण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. अभिषेक मागील ६ सामन्यात चार वेळा शून्यावर बाद झालाय. यंदा ईशान किशन आणि तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. शाहीन आफ्रिदीच्या षटकात १५ धावा ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

SCROLL FOR NEXT