ishan kishan saam tv news
Sports

Ishan Kishan: BCCI ला खोटं बोलणं इशानला महागात पडणार; मानसिक थकवा नव्हे तर या कारणामुळे घेतली विश्रांती?

Ishan Kishan News: भारतीय संघातील युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

Ankush Dhavre

Ishan Kishan News:

भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे.

या मालिकेतून भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली कमबॅक करताना दिसून येणार आहेत. दोन्ही खेळाडू टी-२० वर्ल्डकपनंतर आपला पहिलाच टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दरम्यान संघातील युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

इशान किशनला वनडे,टी-२० आणि कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिक पार पडली. या मालिकेत इशान किशनला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं.

मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. ही मालिका भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. या दौऱ्यावरही त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र यावेळीही त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं नाही. त्यामुळे इशान किशन नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सध्या तो दुबईमध्ये पार्टी करत असल्याची बातमी समोर आली आहे. (Latest sprots updates)

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात असे म्हटले गेले होते की, मानसिक थकवा आणि सतत प्रवास केल्यामुळे तो थकलेला आहे.त्यामुळे त्याला विश्रामाची गरज होती. मानसिक थकवा आणि कुटुंबासोबत वेळ घालवायचा म्हणून त्याने बीसीसीआयकडे विश्रांतीची मागणी केली होती. या विनंतीला मान देत बीसीसीआयने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र आता सुत्राने दिलेल्या माहितीत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सध्या तो दुबईत पार्टी करताना दिसून आला आहे. वृत्तात असे म्हटले गेले होते की,इशान किशन अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका खेळण्यासाठी तयार होता.

मात्र निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. या मालिकेत ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. असं असतानाही या संघात इशान किशनला संघात स्थान दिलं गेलेलं नाही. यावरुन स्पष्ट आहे की, इशान किशनच्या वृत्तीवर बीसीसीआय नाराज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT