ishan kishan funny reaction after camera caught him watching young girl dance video went viral  twitter
Sports

Funny Cricket Video: चिमुकलीचा स्टँड्समध्ये 'सामी सामी...'वर Cute डान्स, ईशान किशनची भन्नाट रिअॅक्शन व्हायरल

Ishan Kishan Reaction: ईशान किशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Ishan Kishan Funny Video:

भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने घरात घुसून लंकेवर १० गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. दरम्यान या विजयानंतर ईशान किशनचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

ईशान किशनचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भन्नाट व्हायरल होतोय,ज्यात काही क्रिकेट फॅन्स डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, स्टेडियममध्ये सामी सामी गाणं सुरू आहे.

या गाण्यावर एक चिमुकली थिरकताना दिसून येत आहे. दरम्यान तिचा डान्स सुरू असताना ईशान किशन देखील या डान्सचा आनंद घेत असतो.

त्याचवेळी कॅमेरामॅनची नजर ईशान किशनवर पडते. मोठ्या स्क्रिनवर आपण दिसतोय हे पाहून ईशान किशन देखील आश्चर्यचकीत झाला. त्याची रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. (Latest sports updates)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्यातील आहे. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने ५० षटकअखेर ८ गडी बाद २६५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ५० षटकअखेर २६६ धावा करायच्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला होता. या डावात शुबमन गिलने शतक झळकावलं होतं. मात्र त्याची शतकी खेळी व्यर्थ गेली.

ईशान किशनची कामगिरी..

ईशान किशनकडून आशिया चषकात दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८२ धावांची तुफानी खेळी केली होती. या सामन्यात त्याने हार्दिक पंड्यासोबत मिळून महत्वाची भागीदारी केली होती. त्याने या स्पर्धेतील ४ डावात १४३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT