Irfan Pathan google
Sports

Irfan Pathan: खेळाडूंशी पंगा घेणं इरफान पठानला महागात पडलं; आयपीएल कॉमेंट्री पॅनलमधून थेट बाहेर काढलं

Irfan Pathan Removed From IPL 2025 Commentary Panel: इरफान पठाणला आयपीएल २०२५ च्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आलं आहे. पॅनलमधून वगळल्यानंतर, इरफानने २२ मार्च रोजी "सीधी बात विथ इरफान पठाण" नावाचे यूट्यूब चॅनल लाँच केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकेकाळचा सर्वोत्तम खेळाडू असलेला इरफान पठान निवृत्तीनंतर क्रिकेट कॉमेंट्री विश्वातील मोठं नाव बनलं आहे. आपल्या मतांसाठी आणि स्पष्ट टिपण्ण्यांसाठी इरफान पठान प्रसिद्ध आहे. सामन्यादरम्यान, उत्साह वाढवण्यात कॉमेंटेटरचीही मोठी भूमिका असते.

२२ मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएल २०२५ साठी कॉमेंट्री पॅनेलची नावे २१ मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. परंतु या यादीत माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणचे नाव समाविष्ट नव्हते. गेल्या काही हंगामात इरफान पठाण कॉमेंट्री पॅनेलचा एक महत्त्वाचा भाग होता. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, इरफान केवळ लाईव्ह कॉमेंट्रीमध्येच नव्हे तर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील खेळाडूंविरुद्ध वैयक्तिक अजेंडा राबवतो.

काही भारतीय खेळाडूंनी तक्रार केली होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही भारतीय खेळाडूंविरुद्ध बोलल्याबद्दल इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्यात आले आहे. अनेक खेळाडूंनी त्याच्या कॉमेंट्रीबद्दल तक्रार केली होती. तो वैयक्तिक कॉमेंट्री करत असल्याचा आरोप केला होता. ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान, एका भारतीय खेळाडूला इरफान पठाणच्या कॉमेंट्रीवर इतका राग आला की, त्याने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला. गेल्या दोन वर्षांपासून तो काही खेळाडूंविरुद्ध वैयक्तिक अजेंडा चालवत होता. असा आरोप करण्यात आला आहे.

संजय मांजरेकर आणि हर्षा भोगलेलाही कॉमेंट्री पॅनलमधून वगळले

२०२० मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेसाठी संजय मांजरेकर यांना बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले होते. २०१९ मध्ये झालेल्या अनेक वादग्रस्त घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये सहकारी कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्याशी झालेला वाद, तसेच सौरव गांगुलीवर टीका करणे आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांला "छोटे-मोठे खेळाडू" म्हणणे या गोष्टींमुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

आयपीएल २०१६ सुरू होण्याच्या काही दिवस आधी कोणतेही स्पष्टीकरण न देता हर्षा भोगले यांना कॉमेंट्री पॅनलच्या यादीतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर भोगले यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले होते की, 'मला अजूनही कळत नाही की मी आयपीएलमध्ये कॉमेंट्री का करत नाही आहे.

इंग्रजी कॉमेंटेटर -

इऑन मॉर्गन, शेन वॉटसन, मायकेल क्लार्क, ग्रॅमी स्मिथ, हर्षा भोगले, निक नाइट, डॅनी मॉरिसन, इयान बिशप, अॅलन विल्किन्स, डॅरेन गंगा, नताली जर्मनोस, रवी शास्त्री, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, दीप दासगुप्ता, आरोन फिंच, वरुण आरोन, सायमन डौल, पॉमी एमबांगवा, अंजुम चोप्रा, केटी मार्टिन, डब्ल्यूव्ही रमन आणि मुरली कार्तिक.

हिंदी कॉमेंटेटर -

आकाश चोप्रा, संजय मांजरेकर, मायकेल क्लार्क, सुनील गावस्कर, नवज्योत सिंग सिद्धू, मॅथ्यू हेडन, मार्क बाउचर, शिखर धवन, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, सुरेश रैना, आरपी सिंग, शेन वॉटसन, संजय बांगर, वरुण आरोन, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, वीरेंद्र सेहवाग, केन विल्यमसन, एबी डिव्हिलियर्स, आरोन फिंच, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मोहम्मद कैफ, पियुष चावला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT