team india google
Sports

India vs South Africa 2nd Test: केपटाऊन कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार!या २ खेळाडूंना मिळणार स्थान

India vs South Africa 2nd Test Playing 11: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २०२४ वर्षातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.

Ankush Dhavre

Team India Playing 11 Prediction:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. २०२४ वर्षातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरा सामना जिंकून भारतीय संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यात रविंद्र जडेजाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. सामना सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. आता तो फिट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करताना दिसून येऊ शकतो.

रविंद्र जडेजाला खेळवण्याबाबत बोलताना इरफान पठान म्हणाला की,'रविंद्र जडेजा जर फिट आहे, तर त्याने संघात यावं. अश्विनने या सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली. मात्र सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची कमतरता जाणवली.'पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव फिरकीपटू म्हणून आर अश्विनला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना १९ षटकात ४१ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता. (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की,'रोहित शर्माला गोलंदाजी आक्रमणात कुठलाही बदल करायचा नसेल तरी ठीक आहे. तर बदल करायचा विचार करत असेल तर तो प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमारला संघात स्थान देऊ शकतो. मात्र जर तुम्हाला प्रसिद्ध कृष्णा नेट्समध्ये गोलंदाजी करताना कॉन्फिडन्ट वाटत असेल तर तुम्ही त्याला प्लेइंग ११ मध्ये कायम ठेवू शकता.

प्रसिद्ध कृष्णाबाबत बोलताना इरफान पठाण म्हणाला की,'प्रसिद्ध कृष्णा सेंच्युरियन कसोटीत चांगली गोलंदाजी करु शकतो. दक्षिण आफ्रिकेत तो आपल्या हाईटचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही पाहु शकता की, रबाडाही त्याच उंचीवरुन गोलंदाजी करतो. तो फुल चेंडू टाकतो पण तो ड्राईव्हसाठी नसतो. पहिल्या कसोटीत ही लेंथ पाहायला मिळाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT