Irfan Pathan: इरफान पठाणवर कोसळला दु:खाचा डोंगर! वेस्टइंडिजमध्ये जवळच्या व्यक्तीचं निधन
irfan pathan google
क्रीडा | T20 WC

Irfan Pathan: इरफान पठाणवर कोसळला दु:खाचा डोंगर! वेस्टइंडिजमध्ये जवळच्या व्यक्तीचं निधन

Ankush Dhavre

क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्टचं निधन झालं आहे. या मेकअप आर्टिस्टचं नाव फैय्याद अंसारी असून त्याने वेस्टइंडिजच्या हॉटेलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. फयाज अन्सारी हा इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्टसह चांगला मित्र देखील होता.

माध्यमातील वृत्तानुसार, फयाज अन्सारीचा मृत्यू हा हॉटेलच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून झाल्याचं म्हटलं जात आहे. फयाज अन्सारी हा स्विमिंग पुलच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला रुग्णालयात नेलं. रुग्णालयात नेल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

इरफान पठाण टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडतोय. फयाज अन्सारीने देखील टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी वेस्टइंडिजमध्ये हजेरी लावली होती. इथे तो इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्ट म्हणूनही काम करत होता. ही दु:खद बातमी मिळताच फयाज अन्सारीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

फयाज अन्सारी हा मुळचा उत्तरप्रदेशातील बिजनोरमध्ये राहत होता. मात्र दिल्लीमध्ये स्वत:च सलून असल्याने तो दिल्लीमध्येच राहायचा. इरफान पठाणने त्याच्या कामाचं कौतुक ऐकून सलूनमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते.

फयाज अन्सारी इरफान पठाणचा मेकअप आर्टीस्ट म्हणून काम करत होता. ही दुख:द बातमी मिळताच इरफान पठाणला आश्चर्याचा धक्का बसला आहे. इरफानने फयाज अन्सारीचं पार्थिव भारतात पाठवण्याची सोय करुन दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाचं आंदोलन

Ginger Water: रिकाम्या पोटी आल्याचं पाणी प्या अन् ठणठणीत राहा

Nagpur Deekshabhoomi: दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगविरोधात आंदोलन, १२५ जणांविरोधात गुन्हे

Maharashtra Politics : काळाने घेतलेला हा सूड, यापेक्षाही वाईट दिवस पाहावे लागतील; ठाकरे गटाचा PM मोदींना चिमटा

Monsoon Train Travelling Tips : पावसाळ्यात ट्रेन पकडताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा तुमच्या जीवावर सुद्धा बेतेल

SCROLL FOR NEXT