irfan pathan gets angry on hardik pandya captaincy jasprit bumrah bowling srh vs mi ipl 2024 twitter
क्रीडा

SRH vs MI, IPL 2024: मुंबई इंडियन्सला या चुका नडल्या! इरफान पठाणने केली हार्दिकच्या निर्णयांची 'चिरफाड'

Irfan Pathan On Hardik Pandya: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठानन हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे

Ankush Dhavre

Irfan Pathan On Hardik Pandya:

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठानन हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी गमवावा लागला आहे. या सामन्यात विक्रमी ५२३ धावा कुटल्या गेल्या. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २७७ धावा चोपल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला २४६ धावा करता आल्या.

या सामन्यात हार्दिक पंड्याने नेतृत्व करताना काही चुका केल्या. या चुकांमुळे त्याच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. दरम्यान या लज्जास्पद कामगिरीनंतर इरफान पठाणने एक पोस्ट शेअर केली आहे.

ज्यात त्याने लिहिले की,' हार्दिक पंड्याचं नेतृत्व अतिशय सामान्य होतं. जेव्हा फलंदाज आक्रमक फलंदाजी करत होते त्यावेळी जसप्रीत बुमराहला थांबवणं मला समजण्यापलीकडचं आहे.' हैदराबादने सुरुवातीच्या १० षटकात १६१ धावा चोपल्य. यात बुमराहला केवळ १ षटक टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने केवळ ५ धावा खर्च केल्या होत्या. मात्र तरीदेखील त्याला गोलंदाजीला आणलं नव्हतं.' (Cricket news in marathi)

हार्दिकने गोलंदाजीत तर चुका केल्याच, यासह त्याने फलंदाजीतही काही मोठ्या चुका केल्या. परिणामी मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीबद्दल बोलताना इरफान पठाणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,' फलंदाजीला आलेल्या सर्व फलंदाजांनी २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. मात्र कर्णधार असं करु शकला नाही. त्याने १२० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. मुंबईचा संघ कमबॅक करु शकला नाही,तर नक्कीच मला आश्चर्य वाटेल कारण मुंबईचा संघ हा ऑन पेपर मजबूत दिसतोय.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान हा सामना मुंबईला ३१ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT