IND vs IRE 2st T20I Saam tv
क्रीडा

IND vs IRE 2nd T20I: टीम इंडियाचा टी-20 मालिकेवर कब्जा; भारताने 33 धावांनी उडवला आयर्लंडचा धुव्वा

India Vs Ireland Match 2023: आयर्लंड संघाने 20 षटकात ८ गडी गमावून १५२ धावा केल्या. यामुळे भारताचा ३३ धावांनी विजय झाला

Vishal Gangurde

India Vs Ireland 2nd T20I Match Updates in Marathi:

भारत विरुद्ध आयर्लंडदरम्यान टी-२० मालिकेचा दुसरा सामना डबलिन येथे झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने आयर्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा सामना करण्यासाठी आयर्लंड संघाने 20 षटकात ८ गडी गमावून १५२ धावा केल्या. यामुळे भारताचा ३३ धावांनी विजय झाला. (Latest Marathi News)

टीम इंडियाने दिलेल्या १८६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेल्या आयर्लंड संघाची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. आयर्लंड संघाचे अवघ्या १९ धावसंख्येवर दोन गडी माघारी परतले. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग शून्य धावावर बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने लार्कन टकरलाही बाद केले.

हॅरी टॅक्टरही स्वस्तात माघारी परतला. हॅरीने ७ चेंडूत केवळ ७ धावा कुटल्या. यानंतर उतरलेल्या कँपर आणि अँड्रयुने संघाचा डाव सावरला. कँपरने १७ चेंडूत १८ धावा कुटल्या. त्यानंतर कँपर तंबूत परतला. बालबर्नीने मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलं धुतलं. बालबर्नीने या सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली.

बालबर्नीने ५१ चेंडूत ७२ धावा कुटल्या. मात्र, बालबर्नीची झुंज अयशस्वी ठरली. आयर्लंड संघाने २० षटकात ८ गडी गमावून १५२ धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने आयर्लंडवर ३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ गडी गमावून १८५ धावा केल्या होत्या. भारतासाठी ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाची २० षटकात १८५ धावसंख्या होऊ शकली. तर भारतासाठी टीम इंडियाच्या प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिष्णोईने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT