ms dhoni twitter
क्रीडा

IPL Teams Retention: 7 संघांचे रिटेन केलेले खेळाडू ठरले! धोनी CSK कडूनच खेळणार; पाहा लिस्ट

IPL 2025 Retention Full List: आज आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची फायनल यादी समोर येणार आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूंना ठेवणार आणि कोणाला रिलीज करणार,अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. दरम्यान ८ संघांची रिटेन खेळाडूंची लिस्ट जवळजवळ फायनल झाली आहे.

ईएसपीएनक्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघांची रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ठरली आहे. चेन्नईने कर्णधार ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू खेळडू रविंद्र जडेजा, शिवम दुबे आणि वेगवान गोलंदाज पथिराणाला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एमएस धोनीला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबाद- गेल्या हंगामात धूमाकूळ घालणाऱ्या पाचही खेळाडूंना सनरायझर्स हैदराबादने रिटेन केलं आहे. वृत्तानुसार, या संघाने हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितिश कुमार रेड्डी आणि ट्रेविस हेडला रिटेन केलं आहे.

लखनऊ सुपर जायंट्स - लखनऊ सुपर जायंट्सने आपला कर्णधार केएल राहुलला रिलीज केलं आहे. तर निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयांक यादव, आयुष बदोनी आणि मोहसिन खानला रिटेन केलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स - कोलकाता नाईट रायडर्सनेही आपल्या कर्णधाराला बाहेर केलं आहे. त्यांनी या हंगामासाठी सुनील नरेन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणाला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्स - गुजरात टायटन्सने शुभमन गिल, राशिद खान राहुल तेवतिया आणि शाहरुख खानला रिटेन केलं आहे. गुजरातने राहुल तेवतिया आणि शाहरुख खानला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स- रिषभ पंत देखील आगामी हंगामात लिलावात दिसणार आहे. कारण त्याने दिल्लीची साथ सोडली आहे. या संघाने अक्षर पटले, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पॉरेलला अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : खोटी माहिती, व्हिडिओ, बातम्या शेअर करताना सावधान; अन्यथा...

Complaint Against Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...

NEET मध्ये मोठ्या बदलांची तयारी; परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात अन् अटेम्पट होतील मर्यादित

Raver Vidhan Sabha : तृतीयपंथीयाचे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात पहिलं 'पाऊल'; रावेर मतदारसंघातून उमेदवारी

Coconut Water: नारळ पाणी सोबत 'हे' पदार्थ चुकूनही खावू नये?

SCROLL FOR NEXT