Rohit Sharma and Ryan Rickelton celebrate after powering Mumbai Indians to a crucial win over LSG in IPL 2026. 
Sports

MI Vs LSG: सलग तीन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; IPLमध्ये मुंबईचं आव्हान कायम

MI vs LSG: मुंबई इंडियन्सने ४ मे रोजी एलएसजी विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. सलग तीन पराभवांनंतर मुंबईने विजयाची चव चाखली. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२६ च्या आपल्या 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती असलेल्या सामन्यात मुंबईने स्पर्धेत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. मुंबईने हा सामना ६ विकेट राखत जिंकला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सामन्यात उतरलेल्या मुंबई संघाला माजी कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाचा फायदा झाला.

रोहितने दमदार अर्धशतक झळकावले आणि रायन रिकल्टनसोबत शतकी भागीदारी केली. या विजयासह मुंबईने ८ चेंडू शिल्लक असताना २२९ धावांचे लक्ष्य गाठले. सलग तीन पराभवांनंतर मुंबईचा हा पहिला विजय होता. लखनौ सुपरजायंट्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी केली. रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावा जोडल्या.

रिकल्टनने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ८ षटकारांसह ८३ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर दुखापतीमुळे पाच सामन्यांपासून दूर असलेल्या रोहितने पुनरागमन करताच २७ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. रोहितने ४४ चेंडूत ८४ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. तर रिकल्टनला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना धुवून काढले. लखनौने २० षटकामध्ये ५ विकेट गमावून मुंबईसमोर २२९ धावांचे आव्हान ठेवले. लखनौकडून सलामीवीर मिचेल मार्शने २५ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या, तर जोश इंग्लिसने ५ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने २१ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या, ज्यात १ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. ऋषभ पंतने १० चेंडूंमध्ये १५ धावा केल्या. एडन मार्करमने २५ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. अक्षत रघुवंशीने ७ चेंडूंमध्ये ११ धावांचे योगदान दिले. त्यानंतर एडन मार्करमने २५ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. खालच्या फळीत, हिम्मत सिंगने ३१ चेंडूंमध्ये नाबाद ४० धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लातूरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, पंपावर वाहनांच्या रांगा

देशातील किती राज्यांमध्ये भाजपचा डंका; 78 टक्के लोकसंख्येवर भाजपचं राज्य

CM Salary: मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो? कोणत्या राज्याच्या CM ला मिळते सर्वाधिक वेतन?

बारामतीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय, वहिनींनी मोडला दादांच्या मताधिक्याचा विक्रम

Kerala Results: केरळमध्ये काँग्रेस का जिंकली? स्वत: पंतप्रधान मोदींनी सांगितलं चारपैकी महत्त्वाचं एक कारण

SCROLL FOR NEXT