IPL Media Rights Saam TV
Sports

IPL Media Rights: न्यू मीडिया राइट्समधून होणार 45,000 कोटींची कमाई?

लवकरच Viacom18, Zee, Sony आणि Star India भारतातील सर्वात महत्त्वाच्या क्रीडा मीडिया हक्कांच्या लिलावात IPL क्रिकेट हक्कांसाठी स्पर्धा करतील अशी अपेक्षा आहे.

वृत्तसंस्था

IPL 2022 चा मेगा लिलावाची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 12-13 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. भारतातील उद्योगपती बीसीसीआयद्वारे आयपीएल मीडिया राइट्स टेंडर जारी करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जगभरातील मीडिया क्षेत्रातील दिग्गज डिस्ने स्टार नेटवर्क, सोनी नेटवर्क, रिलायन्स वायाकॉम 18, अॅमेझॉन मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडिया राइट्स बीसीसीआयला बक्कळ पैसा कमावून देईल अशी आशा आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी अलीकडेच भाकीत केले होते की आयपीएल राइट्स बीसीसीआयला 35,000 कोटी रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. आता बीसीसीआयच्या आणखी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यापेक्षा मोठी भविष्यवाणी केली आहे. बीसीसीआयच्या एका अनुभवी अधिकाऱ्याच्या मते, मीडिया राईट्स BCCI ला 40,000-45,000 कोटी रुपयांपर्यंत पैसे मिळवून देऊ शकतात.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, ज्यांनी यापूर्वी आयपीएलचे (IPL) अध्यक्ष म्हणून काम केले आहे, त्यांनी माध्यमांना सांगितले की, “आयपीएलच्या नवीन मीडिया अधिकारांच्या विक्रीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सज्ज आहे. ते 40,000 ते 45,000 कोटींपर्यंत पोहोचले तर नवल नाही. राइट्सची किंमत मागच्या किंमतीपेक्षी तीन पटीने का वाढली आहे? यावर उत्तर देताना अधिकारी म्हणाले डिजीटल युगात प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. गुंतवणूकदारांच्या खिशात पैसे आहेत. त्यामुळे राइट्सची किंमत तीन पटीने वाढली आहे.

इतकंच नाही तर आयपीएलमध्ये संघ आणि सामन्यांची संख्याही वाढली आहे. स्पोर्ट्स मीडिया राइट्स क्षेत्रातील इंडस्ट्रीतील दिग्गज आशिष चढ्ढा म्हणाले, “हे पहिले आयपीएल मीडिया राइट टेंडर असणार आहे. त्यामुळे अनेक लोक माध्यम हक्कांसाठी मैदानात उतरताना दिसतील. बीसीसीआय अधिकारांचा ई-लिलाव करत असल्याने ते कोणत्या आधारभूत किंमतीपासून सुरुवात करतात हे पाहणे खूप मनोरंजक असणार आहे. लवकरच Viacom18, Zee, Sony आणि Star India भारतातील सर्वात महत्त्वाच्या क्रीडा मीडिया हक्कांच्या लिलावात IPL क्रिकेट हक्कांसाठी स्पर्धा करतील अशी अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

Horoscope: दसऱ्याला बुध-गुरूची युती होणार, ३ राशींवर परिणाम, खिशात राहणार पैसाच पैसा

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, तरुणीला रस्त्यावर लाथांनी बेदम मारहाण | VIDEO

Zubeen Garg Death Case : गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; मॅनेजर अन् महोत्सव आयोजकाला अटक

Facebook New Feature: सोशल मीडिया क्रिएटर्ससाठी खुशखबर! फेसबुकच्या नव्या फीचरने वाढेल कमाई

SCROLL FOR NEXT