Rovman Powell Ipl action 2024 Saam tv
क्रीडा

Rovman Powell Networth: आयपीएलच्या बोलीने आयुष्य बदललं; वेस्ट इंडिजचा ३० वर्षीय खेळाडू एका झटक्यात झाला कोट्यधीश

Vishal Gangurde

IPL Auction 2024 :

इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव सोहळा दुबईत होत आहे. कोका-कोला एरिना येथे सुरु असलेल्या लिलावात ३३२ खेळाडूंवर बोली लावली जात आहे. या लिलाव सोहळ्यात सर्वात आधी बोली वेस्ट इंडिजच्या ३० वर्षीय खेळाडू रॉवमन पॉवेलवर लागली. त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये होती. या लिलाव सोहळ्यात रॉवमन पॉवेलसाठी नाइट राइडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या लिलावात राजस्थान रॉयल्सने पॉवेलवर ७.४० कोटी बोली लावत संघात स्थान दिलं आहे. (Latest Marathi News)

पॉवेलची नेटवर्थ किती?

२३ जुलै १९९३ रोजी जन्माला आलेल्या रॉवमन पॉवेल हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. उजवा हाताने खेळणाऱ्या पॉवेलने वेस्ट इंडिजसाठी टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याला 'पॉवर हिटर' म्हणूनही ओळखलं जातं.

पॉवेलने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. यंदा आयपीएलच्या लिलाव सोहळ्यात पॉव्हेलने जोरदार बाजी मारली आहे. त्याच्या नेटवर्थचं बोलायचं म्हटलं तर रिपोर्टनुसार, १६ कोटी त्याची नेटवर्थ आहे.

पॉवेलची क्रिकेटमधून वार्षिक कमाई किती?

वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पॉवेलची वार्षिक कमाई २ कोटीहून अधिक आहे. या व्यतिरिक्त पॉवेल हा सीपीएल आणि आयीपएलशी करार करून चांगली कमाई करतो. २०२२ मध्ये झालेल्या लिलावात पॉवेलवर दिल्ली कॅपिटल्सने २.८ कोटींची बोली लावली होती.

अलिशान घर आणि लग्झरी कारची आवड

रिपोर्टनसार, रॉवमन पॉवेलचं जमायकाच्या किंग्टन येथे अलिशान घर आहे. या घराची किंमत कोटीच्या घरात आहे. या घराची नेमकी किंमत किती आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. पॉवेलला महागड्या कारची आवड आहे. पॉवेलकडे मर्सिडीज कारसहित एसयूव्ही कार आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये त्याच्या आईने भेट दिलेल्या हुंडई टक्सनचाही सामावेश आहे.

पॉवेलची क्रिकेट कारकिर्द कशी आहे?

पॉवलने वेस्टइंडिजने ६६ टी-२० सामन्यात १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या मदतीने १२०२ धावा केल्या आहेत. तर त्याने आतापर्यंत ५१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात १ शतक आणि २ अर्धशतकाचा सामावेश असून त्याच्या एकूण ९७९ धावा आहेत. पॉवेल फलंदाजीबरोबर गोलंदाजीही चांगली करतो. एकदिवसीय सामन्यात तीन तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ५ गडी बाद केले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT