IPL 2022 Twitter/ @IPL
क्रीडा

IPL Most Expensive Players : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू; दोन भारतीय खेळाडूंचा TOP 5 मध्ये समावेश

आयपीएलच्या लिलावाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत यावर एक नजर टाकूया.

साम टिव्ही ब्युरो

IPL Most Expensive Players : IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव उद्या पार पडणार आहे. सर्वच फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडतील. यावेळी लिलावात असे काही खेळाडू आहेत जे लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात.

आयपीएलच्या लिलावाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत यावर एक नजर टाकूया. (Cricket News)

ख्रिस मॉरिस

IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसच्या नावावर आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आणि आपल्या संघात त्याचा समावेश केला. आयपीएलच्या इतिहासातील तो आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू आहे. (Latest Marathi News)

युवराज सिंग

इंडियन प्रीमियर लीगमधील दुसऱ्या सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. या डॅशिंग अष्टपैलू खेळाडूला 2015 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने तेव्हाच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा क्रिकेटर आहे. इंडियन प्रीमियर लीग 2020 सीझनसाठी कोलकाता नाइट रायडर्सने त्याला 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यावेळी तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू होता.

ईशान किशन

ईशान किशन हा आयपीएलमधील चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

काइल जेमिसन

आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा काइल जेमिसन पाचव्या क्रमांकावर आहे. 2021 च्या आयपीएल लिलावादरम्यान, त्याच्यासाठी बोली लावण्यासाठी पंजाब किंग्ज आणि RCB यांच्यात लढत झाली होती. शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. आरसीबीने जेमिसनला 15 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT