Sports

IPL 2025 LSG vs CSK: मुंबईनंतर चेन्नईचे कमबॅक,घरच्या मैदानात लखनऊ पराभूत

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगच्या ३० व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आले. या सामन्यात लखनऊचा दारुण पराभव झाला.

Bharat Jadhav

एकाना स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ मधला ३० वा सामना झाला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा चेन्नई सुपर किंग्सने ५ विकेट राखत पराभव केला. लखनऊ संघाने दिलेल्या १६७ धावांचे आव्हान सीएसकेने अखेरच्या षटकात ५ विकेट राखत पार केलं. एमएस धोनी आणि शुभम दुबे यांच्या भागीदारीने चेन्नईच्या संघाने लखनऊला मात दिली. एमएस धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने दिलेलं फलंदाजीचं आमंत्रण घेऊन मैदानात उतरलेल्या लखनऊच्या संघाने २० षटकात १६६ धावा केल्या. यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावलं होतं.

लखऊनने दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली. शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांनी स्फोटक फलंदाजी केली. मात्र शेख रशीद ५ व्या षटकात बाद झाला. रशीदने २७ धावा आल्या. त्यानंतर लगेचच रवींद्रची विकेट ८ व्या षटकात पडली. त्याने ३७ धावा आल्या. यानंतर पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठीने आपली विकेट दिली. या सामन्यात जडेजा कमाल दाखवेल असं वाटलं होतं. परंतु तोही चमत्कार करू शकला नाही. जडेजा फक्त ७ धावा करून बाद झाला. यानंतर १५ व्या षटकात विजय शंकरही ९ धावा करून तंबूत परतला.

अशी होती लखनऊची खेळी

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. खलील अहमदने पहिल्याच षटकात मार्करमला बाद केले. यानंतर चौथ्या षटकात निकोलस पूरणही कंबोजचा बळी ठरला. पूरणने ८ धावा आल्या. यानंतर, पंत आणि मार्शमध्ये चांगली भागीदारी झाली पण जडेजाने १० व्या षटकात मार्शला बाद करत त्यांची भागीदारी तोडली. यानंतर १४ व्या षटकात, जडेजाने चांगल्या लयीत असलेल्या बदोनीला बाद केले. बदोनीने २२ धावा आल्या. पण ऋषभ पंत एका टोकाला ठाण मांडून होता. पंतने ६३ धावांची खेळी केली. या आधारावर लखनऊने चेन्नईला १६७ धावांचे लक्ष्य दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT