MI Playoff Scenario X
Sports

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Hardik Pandya: हार्दिक पांड्या आजारी असल्यानं त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नाही. हार्दिक मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये कधी परत येईल, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

Bharat Jadhav

मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची आनंदाची बातमी

आजारपणामुळे दिल्लीविरुद्धचा सामना चुकवला

पांड्याच्या अनुपस्थितीत संघाला पराभव

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत विजयाचा श्रीगणेशा केला होता. मात्र ४ एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात खेळला नाही. आजारपणामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती.

या सामन्यात त्याची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवली. हार्दिक कधी तंदुरुस्त होईल, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. आता त्याच्या आरोग्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ७ एप्रिल रोजी गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघासोबत गुवाहाटीला रवाना झाला आहे.

हार्दिक पांड्या लवकरच सरावाला सुरुवात करणार आहे, असेही वृत्तात म्हटले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पांड्याची प्रकृती तितकी गंभीर नव्हती, परंतु मुंबई इंडियन्स संघाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे याच कारणामुळे त्यांनी हार्दिकला विश्रांती घेण्याची परवानगी दिली. आजारपणामुळे हार्दिकने दोन सराव सत्रातही भाग घेतला नव्हता. मात्र आता तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानावर परतणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ एका विजयासह आणि एका पराभवासह आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट -०.२०६ आहे. आता ते ७ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवून आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT