New Rule for IPL 2026 SAAM TV
Sports

IPL New Rule : आयपीएल सुरू होण्याआधी नवे नियम आले, बीसीसीआयने केले 7 बदल; वाचा कुणाला होणार फायदा

New Rule for IPL 2026: आयपीएल 2026 साठी बीसीसीआयने 7 नवीन नियम जाहीर केले आहेत. सामन्याच्या दिवशी प्रॅक्टिस बंदीपासून ते प्रवास आणि फिटनेस नियमांपर्यंत काही महत्त्वाचे बदल आहे ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल सुरू होण्यासाठी आता फक्त ४ दिवस उरले आहेत. २८ मार्चपासून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. यंदाचा हा आयपीएलचा १९ वा सिझन असून बीसीसीआयने काही नवे नियम जाहीर केले आहेत. हे ७ नियम सर्व १० टीम्सना पाळावे लागणार आहेत.

सर्वांच्या मनात प्रश्न असा आहे की, बीसीसीआयने जाहीर केलेले हे ७ नियम नक्की आहेत तरी काय? जाणून घेऊया बीसीसीआयने आयपीएलसाठी जाहीर केलेल्या या नव्या नियमांबाबत.

IPL 2026 साठी BCCI चे 7 नियम

सामन्याच्या दिवशी प्रॅक्टिस नाही

बीसीसीआयचा हा पहिला नियम टीमची प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग संबंधित आहे. कोणत्याही आयपीएलच्या टीमला त्यांच्या सामन्याच्या दिवशी प्रॅक्टिस करण्याची परवानगी नसेल.

२ दिवसांपेक्षा जास्त प्रॅक्टिस नाही

दुसरा नियम देखील खेळाडूंच्या प्रॅक्टिस संदर्भात असणार आहे. कोणत्याही टीमला २ पेक्षा जास्त प्रॅक्टिस सामने खेळता येणार नाहीत. प्रॅक्टिस सामना खेळण्यापूर्वी त्यांना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. याशिवाय कोणताही सामना साडेतीन तासांपेक्षा जास्त वेळाचा नसावा.

इतर टीमचे नेट्स वापरण्यास मनाई

बीसीसीआयचा तिसरा नियम हा नेट्स प्रॅक्टिस संदर्भात आहे. कोणतीही टीम त्यांचे प्रॅक्टिस नेट शेअर करणार नाही. प्रत्येक टीमला प्रॅक्टिससाठी नवे नेट्स मिळणार आहे. एका टीमला दुसऱ्या टीमचे नेट्स वापरण्याची परवानगी नसेल. भले ते नेट्स रिकामे असेल तरी ते वापरण्यात येणार नाही.

प्रमुख पीचवर प्रॅक्टिस करता येणार नाही

यंदा पीचबाबत देखील नियम तयार करण्यात आला आहे. यामध्ये होम टीम ज्या मैदानावर त्यांचा पहिला सामना खेळणार आहे, तिथे चार दिवस अगोदर प्रॅक्टिस करता येणार नाही. खेळाडूंना त्यांच्या शॉट्सची प्रॅक्टिस करण्यासाठी वेगळे पीच दिले जाणार आहे.

कुटुंबिय आणि मित्र

यंदाच्या आयपीएलमध्ये BCCI चा हा एक नियम खेळाडूंचे कुटुंबीय आणि मित्रांशी संबंधित आहे. कोणत्याही खेळाडूच्या फॅमिली आणि मित्रांना त्यांच्यासोबत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा खेळाडू जेव्हा प्रॅक्टिससाठी प्रवास करतील तेव्हा त्यांना टीमच्या बसनेच यावे-जावे लागणार आहे.

एलईडी बोर्डजवळ बसण्यास मनाई

आयपीएलच्या सामन्यादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना मैदानाच्या बाजूला असलेल्या एलईडी बोर्डजवळ बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

सामन्याच्या दिवशी फिटनेस टेस्ट नाही

ज्या दिवशी सामना आहे त्या दिवशी कोणत्याही खेळाडूंची फिटनेस टेस्ट चाचणी घेतली जाणार नाही. खेळाडूंनी अवॉर्ड सेरेमनीच्या वेळी त्यांना देण्यात आलेली पर्पल किंवा ऑरेंज कॅप घालून येणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Tuesday Horoscope : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, 5 राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

SCROLL FOR NEXT