Yuzvendra Chahal hat trick  
Sports

IPL 2025: CSK च्या बालेकिल्ल्यात युजवेंद्र चहलची हॅटट्रिक; एकाच षटकात घेतले ४ बळी, नंतर केलं खास सेलिब्रेशन| Video viral

Yuzvendra Chahal hat trick in ipl 2025: चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने हॅटट्रिक घेतली. आयपीएलमधील ही त्याची दुसरी हॅटट्रिक आहे.

Bharat Jadhav

पंजाब किंग्जचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध हॅटट्रिक घेतली. त्याने आपल्या तिसऱ्या षटकात चेन्नई सुपर किंग्जच्या चार खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यादरम्यान, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रिक घेतली. दरम्यान २०२३ नंतर आयपीएलमधील ही पहिलीच हॅटट्रिक आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर चहले आपल्या फिरकीची जादू दाखवत चेन्नई सुपर किंग्जचे दीपक हुडा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद या फलंदाजांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने तीन षटकांत ३२ धावा देत चार विकेट्स घेतल्या. चहलने डावाच्या १९ व्या षटकात एमएस धोनीलाही तंबूत पाठवलं. त्यानंतर त्याने सलग तीन चेंडूंवर तीन खेळाडूंना बाद करत आयपीएलमधील त्याने दुसऱ्यांदा हॅटट्रिक पूर्ण केली. १९ व्या षटकात युजवेंद्र चहलने दुसऱ्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचं आकर्षण असलेला एमएस धोनीला बाद केलं.

चौथ्या चेंडूवर चहलने दीपक हुड्डाला झेलबाद केलं. त्यानंतर पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोज क्लीन बोल्ड झाला आणि त्यानंतर नूर अहमद शेवटच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. स्टार लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याची पहिली आयपीएल हॅटट्रिक घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT