Arshad khan Virat Kohli x
Sports

Arshad Khan : वडिलांना शिपायापेक्षा कमी पगार, कोण आहे विराट कोहलीला आउट करणारा अरशद खान?

RCB VS GT Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात अरशद खान चमकला. त्याने आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला बाद केले. तेव्हापासून अरशद खानच्या नावाची चर्चा होत आहे.

Yash Shirke

चिन्नास्वामी स्टेडियमवर काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स ही लढत रंगली होती. कालच्या सामन्यामध्ये विराट कोहली फक्त ७ धावा करुन बाद झाला. अरशद खानने विराटला शॉर्ट ऑफ पिच बॉल टाकला. त्यावर विराटने अनियंत्रित शॉट मारला. डीप फाइन लेगवर असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने विराटची कॅच पकडली. विराटच्या विकेटमुळे अरशद खानची सोशल मीडियावर चर्चा व्हायला सुरुवात झाली.

अरशद खानवर मेगा ऑक्शनमध्ये १ कोटी ३० लाख रुपयांची बोली गुजरात टायटन्सने लावली आणि संघात समाविष्ट केले. त्याआधी अरशद मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. लखनऊ सुपरजायंट्समध्येही अरशदला संधी मिळाली होती. पण कालच्या सामन्यात विराटला बाद केल्यानंतर अरशद खानच्या नावाची चर्चा व्हायला सुरुवात झाली.

अरशद खानचा जन्म मध्यप्रदेशच्या सिवनीमध्ये झाला होता. त्याचे वडील अशफाक क्रिकेट कोच आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून अरशदने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अशफाक त्यांच्या मुलाला, अरशदला कोच अब्दुल कलाम यांच्याकडे घेऊन गेले. अकराव्या वर्षी त्याने अंडर-१४ टीममध्ये जागा निर्माण केली. सुरुवातीला फलंदाजी करण्याची आवड असलेल्या अरशदने पुढे वेगवान गोलंदाजी करण्याचे ठरवले.

ज्यावेळेस अरशद खानने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा वडिलांनी त्याला १६ हजार रुपये किंमतीचे क्रिकेट किट खरेदी करुन दिले होते. त्यावेळेस अरशदच्या वडिलांचा पगार फक्त १५ हजार रुपये इतका होता. ही गोष्ट अरशदच्या आईने त्याला सांगितली होती. हलाखीच्या परिस्थितीतून अरशद खान इथवर पोहोचला आहे. २०२२ मध्ये अरशदने नशीब चमकले. त्याला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांची बोली लावून संघात सामील केले. पण दुखापतीमुळे त्याला मुंबईकडून खेलता आले नाही. पुढे २०२३ मध्ये अरशदने आयपीएलमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT