IPL 2025 X
Sports

IPL 2025 फक्त आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून लवकरच मोठी घोषणा होणार

India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणले गेले आहे. युद्धजन्य परिस्थिती पाहता बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढत असल्याचे पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरने भारताने पहलगामचा बदला घेतला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. काल ८ मे रोजी पाकिस्तानने रात्रीच्या अंधारात भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२५ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल फक्त एका आठवड्यासाठी स्थगित केले असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

भारतात आयपीएल २०२५ ही क्रिकेट लीग सुरु होती. याच दरम्यान भारत-पाकिस्तान संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणले गेले. काल पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधींचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याच दरम्यान सुरु असलेला धरमशालामधील पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना रद्द करण्यात आला. काही तासांपूर्वी आयपीएल २०२५ स्थगित झाल्याचे समोर आले होते. पण आता बीसीसीआयने आयपीएल फक्त या एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, 'सध्याच्या परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात ले आहे. चर्चा-सल्लामसलत केल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. बीसीसीआय देशातील सशस्त्र दलांच्या आणि सरकारच्या पाठीशी आहे.'

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व प्रमुख स्टेकहोल्डर्सशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंने व्यक्त केलेल्या भावना कौन्सिलकडे मांडल्या. त्यानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचे ठरवण्यात आले आहे. या आठवड्यात आयपीएल संबंधित पुढील निर्णय घेतले जातील असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT