Rohit Sharma DRS Video 
Sports

RR vs MI: DRS ची टिक-टिकनं वाढवली चाहत्यांची धकधक; अखेरच्या सेकंदावेळी निर्णय घेतला अन् रोहितनं इतिहास रचला

Rohit Sharma DRS Video: राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तिसऱ्या अर्धशतकाला गवसणी घातली. पण डावाच्या सुरुवातीला मात्र अनेक चाहत्यांच्या हृदयाची धकधक वाढली होती.

Bharat Jadhav

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई आणि राजस्थान रॉयल्सचा संघ आमने-सामने आलेत. या सामन्यात मुंबईच्या संघानं संथ आणि संयमी फलंदाजी केली. एमआयच्या सलामीवीरांनी धमाकेदार फलंदाजी करत १०० धावांची भागीदारी केली.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातलं रोहित शर्माने तिसरं अर्धशतक केलं. रोहितनं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितनं राजस्थानच्या विरुद्धाच्या सामन्यात ५३ धावांची खेळी केली. मात्र डावाच्या सुरुवातीलाच चाहत्याच्या हृदयाची धकधक वाढली होती. पण ऐनवेळी डीआरएस घेत चाहत्यांना दिलासा दिला.

पाच सेकंदाचा डीआरएस

रिकल्टन आणि रोहित सलामीसाठी आले होते. त्यावेळी मुंबई संघाची धाव संख्या ९ होती. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद होण्याची अपील करण्यात आली. पण रोहितला तो नाबाद असल्याची शाश्वती नव्हती. डीआरएस घेण्याचा वेळ निघून जात होता. रोहितला आपण बाद असल्याचं वाटत होतं. तो डीआरएसही घेत नव्हता. नॉन स्ट्रइकला रिकल्टन होता, दोन्ही फलंदाजांमध्ये त्याबाबत चर्चा झाली. चर्चा केल्यानंतर रोहितं अखेरच्या सेकंदात डीआरएस घेतला. ऐनवेळी घेतलेला निर्णय योग्य ठरला आणि तो नाबाद ठरला.

रचला इतिहास

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळताना रोहित शर्मानं ६००० हजार धावांचा टप्पा पार केला. टी-२० क्रिकेटमध्ये एका फ्रँचायझीकडून हा पल्ला गाठणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरलाय. या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. विराटनं आरसीबीकडून ८८७१ धावा केल्यात. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन रोहित दुसऱ्याच षटकात फसला होता. फझलहक फारूखी च्या षटकात पंचांनी त्याला पायचित आउटही दिलं होतं. रिव्ह्यू घेऊ का नको अशा संभ्रमात रोहित होता. पण शेवटचा सेकंद बाकी असताना रोहितनं डीआरएस घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा मोठा निर्णय! भाजपसोबत युती नाही

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

SCROLL FOR NEXT