IPL 2025 Retention google
Sports

IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

IPL 2025 Mega Auction, Player Retention Limit: आयपीएल 2025 स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात किती खेळाडूंना रिटेन करता येणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा समाप्त झाली आहे. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. आगामी 2025 आयपीएल स्पर्धेपूर्वी मेगा ऑप्शन होणार आहे. मेगा ऑप्शनच्या नियमानुसार प्रत्येक फ्रॅंचाईजीला 3+1 म्हणजे 4 खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली जाते. या नियमानुसार फ्रॅंचाईजी 3 खेळाडूंना रिटेन करू शकतात. तर एका खेळाडूला राईट टू मॅच कार्डनुसार पुन्हा एकदा खरेदी करू शकतात. मात्र फ्रॅंचाईजींनी 4 नव्हे तर 8 खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी केली होती.

फ्रॅंचाईजींनी आगामी हंगामात 8 खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी केली होती. मात्र न्यूज 18 च्या वृत्तानुसार बीसीसीआय 3 +1 च्या नियमावर अडून आहे. बीसीसीआयचं म्हणणं आहे की, मेगा ऑक्शनमुळे सर्व संघांमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळतात. त्यामुळे बीसीसीआय 8 खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी फेटाळून लावू शकते.

माध्यमातून वृत्तामध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, बीसीसीआयने 4 पेक्षा अधिक खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. जर 8 खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली गेली, तर सर्व संघ 6 खेळाडूंना आपल्या संघात ठेवू शकतील आणि 2 खेळाडूंना राईट टू मॅच कार्डने पुन्हा खरेदी करु शकतील. यामुळे आयपीएलच्या लोकप्रियतेवर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...म्हणूनच देवेंद्र फडणवीस-अमित शाहांनी लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं, मनोज जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Upvasache Modak Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा उपवासाचे मोदक, गणपतीला दाखवा स्पेशल नैवेद्य

Flipkart BBD Sale 2025: फ्लिपकार्ट Big Billion Days सेल लवकरच सुरू होणार, मिळणार डिस्काउंट्स आणि कॅशबॅक ऑफर्स

Jaya Bachchan : पापाराझींना पोज दिली अन् हसून साधला संवाद, जया बच्चन यांचा 'तो' VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT