आयपीएलच्या 18 व्या हंगामात मुंबई संघाची सुरुवात खराब झाली होती. परंतु नंतर जोरात कमबॅक करत पाईट्स टेबलमध्ये धुमाकूळ घातलाय. मुंबईने वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत सलग पाचवा मिळवलाय. मुंबईने लखनौच्या संघाला २१६ धावांचा आव्हान दिलंय. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ १६१ धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईने ५४ धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. तर दुसरीकडे दिल्लीला आरसीबीने पराभूत केलंय.
या विजयानंतर मुंबईच्या संघाला तगडा फायदा झालाय. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेत टॉप ५ मध्ये उलटफेर झालीय. दरम्यान प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी मुंबईला अजून सामने जिंकणं आवश्यक आहे.
लखनौला पराभूत केल्यानतंर मुंबईच्या संघाने पॉइंट्स टेबलमध्ये ३ स्थानांची झेप घेतलीय. लखनौविरूद्धच्या सामन्याआधी पाचव्या स्थानी होती. विजयानंतर मुंबईने थेट दुसर्या क्रमांकावर उडी घेतलीय. या विजयामुळे दिल्ली कॅपिट्ल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्सला मोठा झटका बसलाय. या दोन्ही संघांची एका स्थानाने घसरण झालीय. लखनौविरूद्धच्या सामन्यात मुंबईने मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. तर दुसरीकडे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने त्यांना पराभूत पॉइंट्स टेबलवर अव्वलस्थान गाठलंय.
मुंबईचा नेट रनरेटही चांगलाच वाढलाय. यामुळे मुंबईने आरसीबीला पछाडत दुसऱ्यास्थानी झेप घेतलीय. मुंबईचा नेट रनरेट सामन्याआधी +०.६७३ असा होता. तर विजयानंतर नेट रनरेट +०.८८९ असा झाला. मुंबईने लखनौला पराभूत करत या मोसमातला सहावा विजय मिळवलाय. यासह मुंबईचा संघ १२ पॉइंट्स मिळवणारी चौथी टीम ठरलीय. मुंबई व्यतिरिक्त गुजरात, दिल्ली आणि आरसीबी या तीन संघांच्या खात्यातही 12 गुण आहेत.
गुजरात संघाचा नेट रनरेट इतर ३ संघांच्या तुलनेत चांगला असल्याने ते पहिल्या स्थानी आहेत. तर मुंबई संघाचे नेट रनरेट जास्त असल्याने दिल्ली आणि आरसीबीचा संघ मागे राहिले आहेत. तर प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी ८ विजय म्हणजे १६ पॉइंट्स आवश्यक असतात. आता लखनौला पराभूत करत मुंबईचा संघ प्लेऑफच्या आणखी जवळ आलाय. मुंबईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आणखी २ सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईचा पुढील सामना हा १ मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.